पिंपरी-चिंचवड

अपघात झालेल्या बसचा वाहन परवाना निलंबित

CD

पिंपरी, ता. ९ ः आळंदी-मरकळ रस्‍त्‍यावर अपघात झालेल्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍यावतीने ही कारवाई करण्यात आली. तसेच बस मालकाला दंडही केला असल्‍याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी दिली.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचा नुकताच आळंदी- मरकळ रस्त्यावरील दाभाडे सरकार चौकाजवळ अपघात झाला होता. या अपघातानंतर बस चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आता या बसला शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचा परवानाच नसल्याचे उघड झाले आहे. आपत्कालीन दरवाजाच्या ठिकाणी जादा सीट बसवली होती. त्यामुळे बसचा आपत्कालीन दरवाजा न उघडल्यामुळे मुलांना काच फोडून बाहेर काढावे लागले होते. नशीब बलवत्तर म्हणून या बसमधील ७० मुलांना कोणताही त्रास झाला नाही. अपघातानंतर शहरातील शालेय वाहतूक करणाऱ्या बसचा प्रश्न ऐरणीवर आला. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी आरटीओकडून परवाना घेणे बंधनकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT