पिंपरी-चिंचवड

हवालदार मृत्यूप्रकरणी धागेदोरे मिळेना

CD

पिंपरी, ता. ९ : दोन दिवस उलटूनही पिंपळे सौदागर येथील ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणी कुठलेही धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला होता.
सचिन विष्णू माने (वय ४३, रा. आदित्य अपार्टमेंट, मोशी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. माने हे रविवारी (ता. ७) रात्री पावणे दहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील पीके चौक येथून दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.
याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला. मात्र, दोन दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. मात्र, घटनास्थळी जवळपास पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत.
सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे म्हणाले,‘‘परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. परिसरात चौकशीही केली जात आहे. धडक देणारे वाहन नेमके कोणते होते हे स्पष्ट सांगता येत नाही. पोलिस आरोपीच्या मागावर असून अधिक तपास चालू आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

माणूस २०० वर्षे जगणार? शास्त्रज्ञांना सापडली १०० पट वेगाने DNA दुरुस्त करणारी 'मास्टर की'! काय आहे व्हेलचं कनेक्शन?

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील मुळा नदीच्या पात्रात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT