पिंपरी-चिंचवड

विवाह मान्य नसल्याने दाजीचा खून मोशीतील प्रकार ः मृतदेह जाळून हाडे, राख नदीत फेकली

CD

पिंपरी, ता. ९ : बहिणीने मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात धरून, भावाने दाजीचा डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर डिझेलने मृतदेह जाळला. पुरावा नष्ट करण्यासाठी हाडे व राख पोत्यात भरून नदीत टाकून दिले. ही धक्कादायक घटना मोशीतील आदर्शनगर येथे घडली. याप्रकरणी विवाहितेचा सख्खा भाऊ, मेहुण्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून, एक चुलत भाऊ फरार आहे.

अमीर महम्मद शेख (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी, मूळ - राधे, ता. पारनेर, जि. नगर) असे खून झालेल्याचे नाव आहे तर त्याचा साडू पंकज विश्वनाथ पाईकराव (वय २८, रा. मार्तंडनगर, चाकण, मूळ - भिंगे आडगाव, जि. हिंगोली), सख्खा मेहुणा सुशांत गोपाळा गायकवाड (वय २२, रा. राधे, ता. पारनेर, जि. नगर) आणि सुनील किसन चक्रनारायण (वय ३३, रा. मोई रोड, चिंबळी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चुलत मेहुणा गणेश दिनेश गायकवाड (रा. राधे, ता. पारनेर जि. नगर) हा फरार आहे. मृत अमीर व आरोपी सुशांतची बहिण यांचा सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघेही मोशी येथे राहत होते. मात्र, हा विवाह अमीरच्या सासरच्या लोकांच्या मनाविरुद्ध झाला होता.
अमीर हा १५ जूनला कंपनीत कामाला जातो, असे सांगून निघून गेला. तो परत घरी न आल्याने त्याची पत्नी अरीना अमीर शेख हिने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती. या तपासात अमीर याला त्याचा साडू पंकज याने फोन करून बोलावून घेतल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी पंकजला २१ जूनला अटक केली. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.
आरोपींनी आमीरला दारु पिण्याच्या बहाण्याने फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील जंगलात ते दारू पित बसले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या आरोपी सुशांत व गणेश यांनी आमीरला मारहाण करीत जंगलात ओढत नेले आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. मृतदेह जंगलात लपवून ठेवला. सुशांत व गणेश यांनी डिझेलने मृतदेह जाळून टाकला.
--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Koyna Reservoir Renamed : आता कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, पाहा काय आहे GR?

Malin Landslide: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे! १५१ जणांना गिळणाऱ्या काळरात्रीची वेदना आजही कायम, दरडीत गाडले गेले संपूर्ण गाव

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली अन् ...

ED Raid Coal Mafia : देशातील मोठ्या कोळसा माफियावर ईडीची छापेमारी; ६०० कोटींची मालमत्ता, १६० कोटींचा म्युच्युअल फंड गोठवला

SCROLL FOR NEXT