पिंपरी-चिंचवड

बोऱ्हाडेवाडी, चऱ्होलीतील लाभार्थी समस्यांनी त्रस्त

CD

पिंपरी, ता. १० : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्‍या बोऱ्हाडेवाडी व चऱ्होली येथील सदनिकांमधील नागरिक विविध समस्‍यांनी त्रस्‍त आहेत. अनेकांच्या ‍घराचे छत पावसात गळत आहे. इमारतींच्‍या सीमाभिंतीला तडे गेले आहेत. सांडपाणी वाहिनीचे पाणी पिण्याच्‍या पाण्यात मिसळत असल्‍याच्‍या तक्रारी रहिवासी करत आहेत. महापालिकेकडूनही दुरूस्‍ती केली जात असल्‍याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर बोऱ्हाडेवाडी आणि चऱ्होली येथे १ हजार २८८ आणि १ हजार ४४२ घरांचा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. सुरूवातीला घरांचा ताबा मिळण्याअगोदरच लाभार्थी नागरिकांकडून सदनिकेच्या किमती व्याजासह वसूल करण्यात आल्या होत्‍या. मात्र, तब्बल दोन वर्षांच्या काळानंतर ताबा देण्यात आला. तरी देखील मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. तेथील चेंबर तुंबलेले असतात. ६० टक्‍के सदनिकांच्‍या छतातून पाणी टपकत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्‍यास पर्यायी सुविधा उपलब्ध नाही. वाहनतळाची सुविधा नाही, आदींसह विविध समस्‍यांचे गाऱ्हाणे रहिवाशांकडून मांडण्यात येत आहे.

चऱ्होलीतील सदनिकांमध्ये छत गळणे, भिंतीतून पाणी पाझरणे असे प्रकार होत आहेत. पाच नंबरच्‍या इमारतीच्‍या सीमाभिंतीला तडे गेले आहेत. प्रवेशद्वार पडण्याची घटना घडली होती. नागरिकांच्‍या सतर्कतेमुळे कोणतीही हानी नाही. आमच्‍याकडून पैसे घेऊन सदनिकाही उशिरा ताब्‍यात दिल्‍या. मात्र, अपुऱ्या सुविधांसह आम्‍हाला राहावे लागत आहे.
- रंगनाथ वाघमारे, रहिवासी


बोराडेवाडी येथे १ हजार २८८ सदनिका आहेत. मात्र, यामधील ६० टक्‍के सदनिकांमध्ये पाणी गळतीची समस्या आहे. पाणी टपकत आहे. इमारती कमकुवत आहेत. त्‍यामुळे, इथल्‍या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार तक्रारी करूनही दुरूस्‍तीबाबत दुर्लक्ष केले जात आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
- स्‍वप्‍नील उत्तेकर, रहिवासी


महापालिकेच्‍या अखत्‍यारित असणाऱ्या तक्रारींवर आम्‍ही त्वरित सकारात्‍मक कार्यवाही करत असून त्या समस्‍या सोडवत आहोत. काही प्रलंबित आणि शिल्लक कामांबाबत नवीन अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. त्‍याबाबतच्याही तक्रारी सोडवू. ज्‍या समस्‍या सोसायटीकडून सोडविणे अपेक्षित आहे. त्‍यासाठी त्‍यांनीही सहकार्य ठेवणे गरजेचे आहे.
- अनघा पाठक, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT