पिंपरी-चिंचवड

महापालिकेच्या कर्ज रोख्यांना एए प्लस स्थिर पतमानांकन महापालिका आयुक्तांची माहिती; विविध प्रकल्पांना चालना

CD

पिंपरी, ता. १० ः महापालिकेच्या २०० कोटी रुपये मूल्यांच्या प्रस्तावित हरित महापालिका कर्ज रोख्यांना (ग्रीन म्युनिसिपल बाँड्स) क्रिसिल संस्थेकडून एए प्लस स्थिर पतमानांकन मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेने रोख्यांच्या माध्यमातून कर्ज उभारणीच्या प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
पर्यावरण आणि हवामान बदलामध्ये सकारात्मक योगदान देणाऱ्या प्रकल्पांसाठी हरित कर्ज रोखे जारी करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यातून उभारलेल्या निधीतून महापालिका क्षेत्रातील गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौक जंक्शन टेल्को रस्ता, हरित सेतूचे अ क्षेत्रीय कार्यालय, निगडी प्राधिकरण प्रभाग १५ या परिसरातील काम आणि शहरातील नॉन-मोटराइज्ड ट्रान्स्पोर्टेशन यासह महापालिकेला आवश्यक वाटणारे हरित प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. तसेच शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करणे, वाहतूक कोंडी कमी करणे, शहरात सायकलिंग लेन विकसित करणे, पादचाऱ्यांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, शहरातील हवेची गुणवत्ता वाढवणे हाही याचा उद्देश आहे.

स्थिर पतमानांकनाचे महत्त्व
- उच्च पतमानांकन योग्यता ः एए प्लस स्थिर पतमानांकन मजबूत आर्थिक स्थिती आणि डीफॉल्टचा धोका कमी दर्शवते
- गुंतवणूकदारांना आत्मविश्वास ः महापालिका निधीचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन आणि परतफेडीच्या क्षमतेची खात्री मिळते
- कर्ज घेण्याचा खर्च कमी ः उच्च पतमानांकनामुळे रोख्यांवरील व्याजदर कमी होऊन कर्ज घेण्याचा एकूण खर्च कमी होतो
- शाश्वततेसाठी साहाय्य ः हरित रोख्यांद्वारे उभारलेल्या निधीचा उपयोग पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी करण्यात येतो.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT