पिंपरी-चिंचवड

ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करणार निकृष्ट दर्जाच्या रस्ताप्रकरणी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

CD

पिंपरी, ता. १० ः निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची देयके काढून, गैरव्यवहार केल्याप्रकरणी ठेकेदाराकडून वसुली करण्यात येणार आहे. या प्रकरणातील दोषी ठेकेदार, महापालिका कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. आमदार अश्विनी जगताप यांच्या तारांकित प्रश्नास त्यांनी उत्तर दिले.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जानेवारी २०२२-२३ आर्थिक वर्षातील रस्त्यांची कोट्यवधी रुपयाच्या डांबरी व सिमेंट काँक्रिट करण्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याच्या ४४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या कामातील दोषी ठेकेदार व निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे करणारे संपूर्ण देयके देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आमदार जगताप यांनी मागणी केली होती.
याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत निविदा दराच्या ४० टक्क्यांपेक्षा कमी दराने स्वीकृत करण्यात आल्या. निविदांपैकी १५ रस्त्यांच्या कामांचे गुणवत्ता व दर्जा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या त्रयस्थ संस्थेमार्फत तपासण्यात आला. त्यांनी दिलेल्या अहवालामध्ये काही रस्त्यांच्या गुणवत्तेमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे दोषी ठेकेदारांकडून रकमेची वसुली व संबंधित रस्त्यांच्या कामावर देखभाल करणाऱ्या महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.’’

‘‘पिंपरी चिंचवड महापालिकेतील रस्त्याच्या कामामध्ये मागील दोन-तीन वर्षापासून सातत्याने महापालिकेने अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाला या कार्यवाहीने लगाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुढे अधिकारी विकास कामे करताना महापालिकेचे हित जोपासण्याचे काम करतील, अशी अपेक्षा आहे.
- अश्विनी जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT