पिंपरी, ता. ३ ः निरामयता शरीराशी निगडीत आहे आणि आनंद हा मनाशी निगडीत आहे. तेंव्हा या दोन्ही गोष्टी प्राप्त करण्यासाठी सत्कर्म करीत रहा, इतरांना बदलायच्या भानगडीत न पडता स्वतःला बदला, सत्संग करा, अध्यात्माकडे वळा, असे आवाहन डॉ. विलास सोमवंशी यांनी केले.
पिंपळे सौदागर येथील ऑल सीनियर सिटीझन असोसिएशनतर्फे ‘निरामय आनंदी जीवन’ विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ऑल सीनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष पवार आणि उपाध्यक्षा शकुंतला शिंदे उपस्थित होते. डॉ. सोमवंशी यांनी ज्येष्ठांना अध्यात्म आणि आरोग्याची योग्य सांगड घालून सुखी जीवनाचे मर्म समजाऊन सांगितले. असोसिएशनचे सदस्य नीता गुप्ता, सुरेखा पाटील, शशिकांत कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, उषा भागवत, अशोक येळंमकर, शोभा पोरवाल यांनी कविता आणि गाणी सादर केली. प्रास्ताविक डॉ. सुभाष पवार यांनी केले. सूत्रसंचालन निर्मला कासार यांनी केले. सखाराम ढाकणे यांनी आभार मानले.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.