पिंपरी-चिंचवड

झपाट्याने विकसित भागात घराची संधी

CD

पिंपरी, ता. ३ ः वाकड, पुनावळे, ताथवडे, रावेत, किवळे, मामुर्डी परिसर झपाट्याने विकसित होत आहे. विविध गृहप्रकल्प इथे उभे राहिले आहेत. काहींचे काम सुरू आहे. पुढील वर्षी कदाचित घरांच्या किमती वाढू शकतात. यामुळे आताच घर घेण्याची संधी साधण्यासाठी आणि घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ’ने शनिवार (ता. ५) आणि रविवारी (ता. ६) ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ ताथवडेत आयोजित केले आहे.
स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण, वेळेअभावी मनासारखे घर शोधणे शक्य होत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन आणि नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळीच्या मुहूर्तावर घराचे स्वप्न पूर्ण करता यावे, एकाच ठिकाणी अनेक गृहप्रकल्पांची माहिती मिळावी. यासाठी ‘सकाळ’ने ‘वास्तू एक्स्पो’चे आयोजन केले आहे. त्यामध्ये वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी, गहुंजे, सोमाटणे, शिरगाव, हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील अनेक गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. अगदी वन बीएचकेपासून फोर बीएचकेपर्यंतच्या सदनिकांची माहिती त्यात मिळेल. शिवाय, घरांच्या किमतीही बजेटमध्ये आहेत. त्यामुळे ‘वास्तू एक्स्पो’ला भेट देऊन स्वतःचं घर बुक करा!

काय? कुठे? कधी? केव्हा?
काय ः सकाळ वास्तू एक्स्पो
कुठे ः सिल्‍व्हर बॅंक्वेट हॉल (कासा डी सिल्व्हर हॉटेल), औंध-रावेत बीआरटी रोड, डांगे चौकाजवळ, सिल्व्हर फिटनेस क्लबमागे, ताथवडे.
कधी ः ५ आणि ६ ऑक्टोबर
केव्हा ः सकाळी ११ ते रात्री ८
प्रवेश व पार्किंग ः विनामूल्य
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१७१८८४०

बांधकाम व्यावसायिक म्हणतात...
पिंपळे सौदागर, वाकड हा टॉपमोस्ट एरिया आहे. या पद्धतीनेच ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे परिसर विकसित होत आहे. यापूर्वीच्या दहा वर्षांच्या स्थितीशी तुलना केल्यास आता बहुतांश बदल झाला आहे. पुढील दहा वर्षांत आणखी मोठे बदल या भागात दिसतील. त्यामुळे आता घर घेतल्यास भविष्यात मोठा फायदा होणार आहे.
- प्रशांत ब्राह्मणकर, व्यवस्थापकीय संचालक, महेश्वरी रिॲलिटी ग्रूप

द्रुतगती मार्ग, बीआरटी मार्ग, प्रस्तावित रिंगरोड यामुळे वाकड ते किवळेपर्यंत भागाची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. सर्वाधिक आयटी व औद्योगिक संस्था व प्राइम लोकेशन असल्याने नागरिकांची घर घेण्याला पसंती आहे. वन बीएचकेपासून फोर बीएचकेपर्यंत घरे या भागात उपलब्ध आहेत. ‘वास्तू एक्स्पो’च्या माध्यमातून विविध पर्याय आहेत.
- प्रकाश छाजेड, संचालक, वर्धमान स्पेसेस

‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये जास्तीत जास्त नामांकित संस्थांच्या प्रकल्पांची माहिती मिळेल. सुखसुविधा, डिझाईन, प्लॅनिंग उत्तम असल्याने घर घेण्याला पसंती आहे. कोणत्या ठिकाणी व कोणत्या प्रकल्पात घर यायचे याची तुलना नागरिकांना करता येईल. बजेटमधील घर निवडता येईल. मुंबई व सातारा कनेक्टिव्हिची असल्यानेही पसंती आहे.
- बाळासाहेब गायकवाड, संचालक, उदय कंस्ट्रक्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

आता 'या' दुकानांचा परवाना रद्द होणार, बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा; निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन

ई-सेवा केंद्र चार दिवसांपासून ठप्प, शासकीय दाखले रखडल्यामुळे पालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT