पिंपरी-चिंचवड

‘सकाळ यिन’च्या कॉलेज समन्वयकांचा सन्मान

CD

पिंपरी, ता. ११ ः ‘सकाळ यिन’चे ‘समर युथ समीट’ तरुणाईच्या साक्षीने अन सळसळत्या उत्साहात नुकतेच पुण्यात पार पडले. ते यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या महाविद्यालयांच्या यिन कॉलेज समन्वयकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विचारांपेक्षा कृतीतून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘समर युथ समीट’ मध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील काही महाविद्यालयांनी सिंहाचा वाटा उचलला होता. एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्‍सेस ॲण्ड रिसर्च, इंद्रायणी महाविद्यालय, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, आंबी या महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या यशाबद्दल यिन कॉलेज समन्वयकांनी व्यक्त केलेल्या भावना.


‘सकाळ’ने ‘यिन’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ‘कॉलेज कट्टा’ सुरू केला आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना लिहिते केले आहे. त्यांच्या नावासहीत कॉलेजच्या उपक्रमाची माहिती प्रसिद्ध होत आहे. हे कौतुकास्पद आहे. विचारांपेक्षा कृतीतून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ ‘सकाळ’ने दिल्‍याबद्दल धन्यवाद.
- डॉ. काजल माहेश्‍वरी, यिन समन्वयक, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रावेत


‘सकाळ यिन’च्या उपक्रमांना शुभेच्छा आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता विकसित होत आहे. ‘लीडरशिप’ वर मोठ्या प्रमाणामध्ये काम केले जात आहे. विद्यार्थ्यांमधून राजकारणी, उद्योजक तयार होत आहेत.
- डॉ. मारुती शेलार, यिन समन्वयक, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्‍सेस ॲण्ड रिसर्च, पिंपरी

ग्रामीण भागातील विद्यार्थी आज शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करत आहेत. ‘यिन’मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. ग्रामीण व शहरी अशी दरी कमी झाली आहे. मावळातील विद्यार्थी या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत.
- प्रा. सत्यजीत खांडगे, यिन समन्वयक, इंद्रायणी महाविद्यालय, मावळ

‘सकाळ यिन’ मुळे फार्मसी, इंजिनिअरिंग, मेडिकल आणि विधीचे विद्यार्थी एकत्र आले आहेत. विद्यार्थ्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांना जग बदलण्याची दिशा मिळाली आहे. आज विधीच्या मुलांना कायद्याच्या चौकटीबाहेर देखील जग पाहता येत आहे.
- ॲड. मयुरी फरकंडे, यिन समन्वयक, डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ लॉ

‘सकाळ यिन’च्‍या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पाया घातला आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होत आहे. ‘सोशल’ विद्यार्थी घडत आहेत. विविध क्षेत्रांतील विद्यार्थी एकत्र येत शिकत आहेत. ‘यिन’ समन्वयातून हे सर्व शक्य झाले आहे.
- प्रा. पायल पानसरे, यिन समन्वयक, डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ फार्मसी, आंबी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT