पिंपरी-चिंचवड

चऱ्होलीतील खासगी शाळेची निविदा प्रक्रिया रद्द

CD

पिंपरी, ता. ११ ः शाळेसाठी आरक्षित चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक २/९२ मधील भूखंडाचे खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मागे घेतला असून संबंधित जागा खासगी संस्थेला देण्याची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
चऱ्होलीतील शाळा आरक्षणावर खासगी संस्थेद्वारे शैक्षणिक इमारत उभारण्याची निविदा प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली होती. त्याला आमदार महेश लांडगे यांचा आक्षेप होता. शाळेसाठी आरक्षित जागेवर क्रीडा शाळा (स्पोर्ट्स स्कूल) विकसित करण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार, कार्यवाही करण्याची त्यांची मागणी आहे.
याबाबत आमदार लांडगे म्हणाले, ‘‘महापालिकेत १९९७ मध्ये चऱ्होली गावाचा समावेश झाला. गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा विकसित करण्यासाठी २०१७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. शाळेचे आरक्षण आहे; तिथे खासगी संस्थेद्वारे शैक्षणिक संकुल उभारण्यापेक्षा महापालिकेच्या माध्यमातून क्रीडा शाळा सुरू केल्यास त्याचा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना फायदा होईल.’’

महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात समाविष्ट गावांच्या विकासाला चालना देण्यात आली. त्यामुळे, ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्शिअल कॉरिडॉर’ विकसित झाला आहे. लोकसंख्या आणि गृहप्रकल्प वाढले आहेत. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि हक्काचे व्यासपीठ तयार व्हावे, यासाठी महापालिकेने चऱ्होलीतील आरक्षण क्रमांक २/९२ मध्ये क्रीडा शाळा अर्थात स्पोर्ट्स स्कूल सुरू करावे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT