पिंपरी, ता. ४ ः तुम्ही घराच्या शोधात आहात! मनासारखं आणि बजेटमधील घर हवे आहे! तुमची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी शनिवारी (ता. ५) आणि रविवारी (ता. ६) ‘सकाळ’ने ताथवडे येथील सिल्व्हर बॅंक्वेट हॉलमध्ये ‘वास्तू एक्स्पो’ आयोजित केला आहे. त्याला भेट द्या आणि नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर घराचे स्वप्न पूर्ण करा!
स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण, घरांच्या किमती पाहता, ‘घर घेणं शक्य नाही’ अशी भावना अनेकांची होऊ शकते. शिवाय, दैनंदिन कामाचे स्वरूप आणि सुट्ट्यांचा अभाव, यामुळे इच्छा असूनही वेळेअभावी अनेक ठिकाणी जाऊन घर शोधणे शक्य होत नाही. त्यासाठी रजा घेणेही शक्य नसते. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी एक किंवा दोन प्रकल्पांनाच भेटी देऊन माहिती घेणे शक्य होते. त्यातील घर पसंत पडतेच असे नाही. याच अडचणी लक्षात घेऊन ‘सकाळ’ने शनिवारी (ता. ५) आणि रविवारी (ता. ६) ‘वास्तू एक्स्पो’चे आयोजन केले आहे. त्यामध्ये वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी, गहुंजे, सोमाटणे, शिरगाव, हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील अनेक गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. अगदी वन बीएचकेपासून फोर बीएचकेपर्यंतच्या सदनिकांची माहिती त्यात मिळेल. शिवाय, घरांच्या किमतीही तुलनेने बजेटमध्ये आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवारची वेळ राखून ठेवा आणि ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला भेट देऊन स्वतःचं घर बुक करा!
‘वास्तू एक्स्पो’त काय?
- नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
- गृहप्रकल्पांची माहिती नागरिकांना मिळणार
- अनेक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध
- घर घेण्याचा निर्णय घेण्याची संधी मिळणार
- वन बीएचकेपासून फोर बीएचकेपर्यंतची घरे
काय? कुठे? कधी? केव्हा?
काय ः सकाळ वास्तू एक्स्पो
कुठे ः सिल्व्हर बॅंक्वेट हॉल (कासा डी सिल्व्हर हॉटेल), औंध-रावेत बीआरटी रस्ता, डांगे चौकाजवळ, सिल्व्हर फिटनेस क्लबमागे, ताथवडे.
कधी ः ५ आणि ६ ऑक्टोबर
केव्हा ः सकाळी ११ ते रात्री ८
प्रवेश व पार्किंग ः विनामूल्य
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१७१८८४०
बांधकाम व्यावसायिक म्हणतात...
‘‘वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे हा नवीन विकसित होणारा परिसर आहे. हिंजवडी आयटीपार्क जवळ आहे. नियोजित रस्ते आहेत. महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी आहे. पुणे, मुंबईच्या तुलनेत या भागातील घरांच्या किमती कमी आहेत. थ्री व फोर बीएचकेंना अधिक मागणी आहे. त्यापद्धतीने घरांचे डिझाईन बघायला मिळते.
- श्रीकांत सोमवंशी, संचालक, ॲक्टोपस आर्म होम सोल्यूशन
‘सकाळ’च्या ‘वास्तू एक्स्पो’मुळे चांगले घर घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. पायाभूत व मूलभूत सुविधांमुळे या भागातील घरांना अधिक मागणी आहे. वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे हे लोकेशन सोईचे आहेत. नामांकित शाळा, महाविद्यालये असल्यामुळे नागरिकांनी या भागात घर घेण्यास पसंती दिली आहे.
- अजय म्हेत्रे, संचालक, रेणुका कन्स्ट्रक्शन
‘सकाळ’ने ताथवडे येथे ‘वास्तू एक्स्पो’ आयोजित केल्याने या परिसरामध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांना निर्णय घेणे सोपे होईल. आमचे दोन प्रकल्प असून आयटी पार्क हिंजवडी आणि मुंबई-बंगळूर महामार्गाशी कनेक्टिव्हिटी आहे. ॲमेनिटीज, पार्किंग, अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. ‘सकाळ’च्या वाचकांनी प्रदर्शनाला भेट देऊन स्वप्नातील फ्लॅट बुक करावा.
- जितेंद्र सोनिगरा, संचालक, श्री सोनिगरा डेव्हलपर्स
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.