पिंपरी-चिंचवड

लाडकी बहीण योजना ----------------- अर्ज भरण्याचे काम महिला बचत गटांना द्या भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांची मागणी

CD

पिंपरी, ता. ११ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच शहरातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी या योजनेचे अर्ज भरून घेण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या योजनेसाठी शहरातील महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम महापालिका प्रभाग कार्यालय स्तरावर करणार आहे. त्यामुळे प्रभाग कार्यालय स्तरावर महिलांची जास्त गर्दी होऊन, त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच प्रशासनाकडूनही महिलांना प्रभावीपणे मदत होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. तसे झाल्यास योजनेसाठी पात्र ठरू शकणाऱ्या अनेक महिला वंचित राहतील. या सर्व शक्यतांचा विचार करून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शहरातील महिला बचत गटांना सक्रिय करून घेतल्यास एकही महिला योजनेपासून वंचित राहू शकणार नाही.

--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT