cloth store robbed at gunpoint esakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad Crime: "आम्ही या भागातले डॉन आहोत.." पिस्तुलाचा धाक दाखवून चिखलीत पळवले कपडे

Chikhli Robbery: पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

CD

पिंपरी, ता. १३ : ‘आम्ही मर्डर केला आहे, आम्ही या भागातले डॉन आहोत,’ अशी धमकी देत दुकानात ट्रायलसाठी परिधान केलेले नवीन कपडे पिस्तुलाचा धाक दाखवून तिघांनी फुकट नेले. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चिखलीतील मोरेवस्ती येथील कपड्याच्या दुकानांत घडली. याप्रकरणी कापड व्यावसायिक प्रफुल्ल मधुकर कांबळे (रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

(cloth-store-robbed-at-gunpoint-in-chikhali-pimpri-chinchwad)

फिर्यादी यांचे चिखली येथील अष्टविनायक चौक परिसरात रॉयल एस के मेन्स वेअर नावाचे कपड्याचे दुकान आहे. यामध्ये आरोपी आले. त्यांनी दुकानात कपडे खरेदी करणार असल्याचे सांगितले. फिर्यादीने त्यांना कपडे दाखवले. यावेळी ट्रायल रूममध्ये एकाने जाऊन शर्ट व पॅन्ट अंगात घातला. मात्र, बाहेर येऊन ते पैसे न देताच निघाले.

यावेळी फिर्यादीने त्यांना कपड्याचे पैसे मागितले असता त्यांनी पिस्तूल बाहेर काढून फिर्यादीवर रोखले. आता तुला खलास करून टाकतो, तुला पैसे मिळणार नाहीत, आम्ही नायर कॉलनीमध्ये मर्डर केला आहे, आम्ही इथले डॉन आहोत, अशी धमकी दिली. तसेच चार हजार रुपयांचे कपडे जबरदस्ती घेऊन गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT