पिंपरी-चिंचवड

राजगुरुनगर- पुणे स्टेशन पीएमपीची नवीन बस सुरू

CD

पिंपरी, ता. ४ : राजगुरुनगर ते पुणे स्‍टेशन मार्गावर नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्‍या मागणीवरून पीएमपीएमएल प्रशासनाच्यावतीने ही सेवा सुरू केली आहे. या मार्गावर दोन बस धावणार आहेत. त्‍यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टळली आहे.
आमदार दिलीप मोहिते, खेड ग्राहक हक्क समिती रंगनाथ सुतार, संजय कुंभार, रवींद्र गुजराती, विष्णू बोराडे, परेश शहा, सिद्धार्थ कांबळे, पीएमपीएलचे डेपो मॅनेजर विजयकुमार मदगे, विष्णू रायकर, अस्लम तांबोळी, शिवाजी दहिफळे आदींच्‍या उपस्‍थित बस सुरू करण्यात आली.
राजगुरुनगर येथून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या मार्गावर असणाऱ्या बसची संख्या कमी असल्‍याने विद्यार्थी, नोकरदार यांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्‍यामुळे या मार्गावर स्‍वतंत्र बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांची होती. त्‍यासाठी सातत्‍याने पाठपुरावा करण्यात आला. यावरून पीएमपीएमएल प्रशासनाने बस मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोन बस आठ फेऱ्यांमध्ये धावणार आहेत.

बस फेऱ्यांची वेळ -
राजगुरुनगर लॉ कॉलेज येथून सकाळी सात, साडे सात वाजता, दुपारी तीन वाजून २० मिनिटे, आणि चार वाजून १० मिनिटांनी बस सुटणार आहे. तर पुणे स्‍टेशन येथून सकाळी साडे नऊ वाजता, साडे दहा वाजता आणि सायंकाळी साडे पाच, साडे सहा वाजता ही बस असणार आहे.

‘‘राजगुरुनगर येथून पुणे स्‍टेशन मार्गावर बस सुरू करण्याची प्रवाशांची मागणी होती. त्‍यानुसार हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दोन बस आठ फेऱ्यांमध्ये धावणार आहेत.
- विजयकुमार मदगे, आगार व्यवस्थापक, भोसरी.

फोटो- 51756

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

Pali News : प्रवाशांचे हाल थांबणार! सर्व अडथळे दूर करत रोहा-पुणे एसटी अखेर बसस्थानकात दाखल

Who is Navnita Gautam? विराट कोहली, स्मृती मानधना यांना 'फिट' ठेवणारी नवनीता गौतम; RCB ने तिच्यासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : हरिवंश यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड केली जाईल

SCROLL FOR NEXT