पिंपरी-चिंचवड

जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण

CD

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे घडली. याप्रकरणी पिंपरीतील झिरो बॉइज चौक येथील २१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज (वय १९), संजय भाजगीर (वय २०), जावेद (वय १९) सुधीर (वय २२, सर्व रा. महात्मा फुले नगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांच्या पत्नी घरी असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत कोयत्याने, दांडक्याने बेदम मारहाण केली. दरम्यान, फिर्यादी यांच्या पत्नीलाही शिवीगाळ केली.

मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : दुचाकी आडवी लावून एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना नवलाख उंब्रे येथे घडली. याप्रकरणी चंद्रमणी लालचंद शिंदे (रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष महादेव सनमुखराव, रोहन साव, कार्तिक साबळे (रा. वराळे, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचे सहकारी मित्रांसोबत पायी जात असताना आरोपी संतोष व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीस दुचाकी आडवी लावली. फिर्यादीला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी डोक्यात, तोंडावर, छातीत बेदम मारहाण केली. शिवीगाळ करून दमदाटी केली.

अश्लील हावभावप्रकरणी महिलेवर गुन्हा
पिंपरी : सार्वजनिक रस्त्यावर थांबून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या तीस वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार योगीराज चौक आळंदी येथे घडला. याप्रकरणी तीस वर्षीय व्यक्तीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे योगीराज चौक आळंदी येथून जात असताना रस्त्याच्या बाजूला थांबलेली महिला अश्लील हावभाव करत होती. महिलेने अश्लील शब्द उच्चारून सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना अडथळा होईल तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल, असे कृत्य केले.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT