पिंपरी-चिंचवड

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या तणावात वाढ महापालिकेच्या मनोरुग्ण विभागाकडील माहिती, काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन मानसिक आरोग्य दिन विशेष

CD

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ : राम शर्मा (नाव बदलले आहे) एक कॉर्पोरेट कर्मचारी म्हणून काम करत होता. त्याचा नऊ ते पाच हा वेळ कार्यालयीन कामकाज करण्यात, इ मेल तपासण्यात, साप्ताहिक रिपोर्ट, कामाचा अहवाल घेणे, तसेच दैनंदिन बैठकींमध्ये संपून जायचा. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून, तो काम करत असे पण त्या हास्याच्या मागे मनात विचारांचे वादळ असायचे. हळूहळू त्याच्यावर कामाचा व्याप वाढत चालला होता. परंतु; यावेळेस त्याच्या कामावरही परिणाम दिसायला लागला. राम आता वारंवार सुटी घेऊ लागला होता. त्याचे कामात फारसे लक्ष नसायचे. व्यसनाचे प्रमाणही वाढले. रामप्रमाणे सध्या शेकडो कर्मचारी तणावात असल्याची धोकादायक माहिती महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) मनोरुग्ण विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला महत्त्व देण्याची वेळ आल्याचे मत ‘मानसिक आरोग्य दिना’निमित्त मानसिक उपचार तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
आयटीयन्स किंवा कार्पोरेट क्षेत्रातील वाढता ताण पाहता, मानसिक आरोग्य खालावल्याने अनेक घटनांवरून दिसून येत आहे.  ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’साठी भरपूर पर्याय असताना, त्यापैकी एक निवडून काही करून ताण दूर करण्याला पसंती दिली जाते. मात्र, पँकेजबद्दल सतत शंकास्पद व अतिमहत्वकांक्षी असणे या दोन गोष्टींमुळे आयटीतील तरुणांना अनेकदा मानसिक संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. आकर्षक पगारांसोबतच नव्या घराचे लागलेले वेध, होम लोन, कामाचा अतिताण आणि त्यामुळे नैराश्य अशा गर्तेत अनेकजण अडकत चालल्याचे दृश्य ‘आयटी कल्चर’चा एक नवा भाग बनले आहे. 
१० ऑक्टोबर १९९२ रोजी पहिल्यांदा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. मानसिक आरोग्य आणि काम यांच्यातील महत्त्वाच्या संबंधावर प्रकाश टाकण्यासाठी ‘मानसिक आरोग्य हा एक सार्वत्रिक मानवी हक्क आहे.’ जागतिक मानसिक आरोग्य दिन २०२४ ची थीम आहे. मानसिक आजार हे मेंदूतील होणाऱ्या रासायनिक बदलांमुळे होतात. मेंदूतील सिरोटोनीन द्रव्याची कमी होणे, मानसिक आणि सामाजिक घटक कारणीभूत असतात.


घरून काम करण्याचा ट्रेंड
कोरोना महामारीमुळे घरून काम करण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्याचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम झाला आहे. प्रवास टळला, लवचिक वेळापत्रक आणि मित्र-परिवारासोबत संवाद वाढल्याचे सकारात्मक परिणाम दिसतात. परंतु, कामाची उत्पादनक्षमता कमी होणे, स्वतंत्र कामाच्या जागेचा अभाव, काम-कौटुंबिक संघर्ष, निष्क्रियता वाढणे, असे नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.


‘‘मानसिक आरोग्य खालावलेल्या व्यक्तींना त्यांची माहिती गोपनीय राहील, अशी खात्री देऊन त्यांना उपचारासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. अशा व्यक्तींना लवचिक कामाच्या वेळा, कार्यस्थळ आणि कामाच्या भूमिकेत आवश्यक ते बदल करणे आवश्‍यक आहे. व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांमधील मानसिक आरोग्याविषयी समस्या ओळखण्यासाठी नियमित प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांसोबत मोकळेपणाने संवाद करावा, मानसिक तणावाचे संकेत समजून घेऊन धोक्यात असलेल्या व्यक्तींसाठी कामाचे वेळापत्रक लवचिक बनवणे महत्त्वाचे आहे.’

- डॉ. हर्षदा देवकते, मानसोपचार तज्ज्ञ, मनोरुग्ण विभाग प्रमुख, वायसीएम

...आकडे बोलतात

वर्ष - मानसिक रुग्णांची संख्या

वर्ष - पुरुष - स्त्रिया- एकूण

२०२० -१३७७-८८८- २२६५
२०२१ -२६२९-१८००-४४२९
२०२२ -४६७९-३०८१-७७६०
२०२३-५७१०-३६६६-९३७६
२०२४-५०५५-३१२६-८१८१

-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT