पिंपरी, ता. ९ ः तळवडे येथे ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’ (जैवविविधता उद्यान) आणि भामा-आसखेड पाणी योजनेअंतर्गत चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प टप्पा-२ कामांचे ऑनलाइन भूमिपूजन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी (ता. ९) झाले.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातून १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचे चिखली जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून वितरण सुरू आहे. आता भामा-आसखेड धरणातून १६८ एमएलडी उपलब्ध करण्यासाठी चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प टप्पा-२ चे काम सुरू होणार आहे. प्रकल्पांतर्गत जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून जून-२०२५ पर्यंत शहराला पाणी मिळेल, असे महापालिकेचे नियोजन आहे. त्यासाठी आमदार महेश लांडगे आग्रही आहेत. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी मिळू लागले आहे. आता भामा आसखेड धरणातून जॅकवेलद्वारे नवलाख उंबरे प्रेशर टँकपर्यंत जलवाहिनीद्वारे पाणी आणणे आणि प्रेशर टँकपासून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणून प्रक्रिया केले जाणार आहे. धरण ते नवलाख उंब्रे बीपीटीपर्यंत (ब्रेक प्रेश टँक) पर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची रायझिंग मेन आणि नवलाख उंबरे येथील ‘बीपीटी’ ते देहूपर्यंत १४०० मिलिमीटर व्यासाची ग्रॅव्हिटी मेन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणचे भूसंपादन करण्यास महापालिकेने प्राधान्य दिले आहे. वाकीतर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे, जॅकवेल, पंपहाऊस, ॲप्रोच ब्रीज, इंटेक चॅनेल बांधणे व विद्युत, यांत्रिकी अशी कामे सुरू आहेत.
बायोडायर्व्हसिटी पार्क
बायोडायव्हर्सिटी पार्कचे ७० एकर जागेत असेल. देशी वृक्ष लागवड केली जाईल. किंबहुना जंगल विकसित करण्यात येणार आहे. प्राणी, पक्षी अधिवास या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे. मृदा संवर्धन, विविध थीमद्वारे वृक्षारोपण, एन्ट्रान्स गेट, बर्ड नेस्ट वॉल, पार्किंग, गोल्फ कार्ट ॲन्ड सायकल स्टेशन, थ्री एन्ट्रान्स प्लाझा, ॲम्पिथिएटर, सोयुवेनिअर शॉप, वर्कशॉप, कॅपे, बटरफ्लाय गार्डन, रिपेरिअन ॲन्ड वेटलँन्डस, ऑर्चिडट्रम, थीम पार्क- कलर्स् ॲड कोअर फॉरेस्ट, टॉयलेट ब्लॉक्स, बायो डिझास्टर, किऑक्स, स्ट्रिम क्रॉसिंग, साइनेज, साईनेज ॲन्ड ग्राफिक फॉर इकॉलॉजी अवेअरनेस, बेन्चेस, लाईटिंग- जनरल लाईटींग, पाथवेज, पिकनिक स्पॉट, रेस्टॉरंट एरिआ, ब्रिज लाईटिंग, व्हिजीबिलीटी लाईटिंग फॉर साइट, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, वेस्ट मॅनेजमेंट, साईल ॲन्ड वेस्ट वॉटर मॅनेजमेंट असा अत्याधुनिक सोयी-सुविधांचा बायोडायव्हर्सिटी पार्क शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालणार आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेस अमृत गटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक आणि भूमी थीमॅटिक पार्कमधील उच्चतम कामगिरीसाठी १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. ही रक्कम प्रकल्पांच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे.
तळवडेत कोनशिला पूजन
पिंपरी-चिंचवडच्या लौकिकात भर घालणारा तळवडेतील ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ (जैवविविधता उद्यान) सुमारे ७० एकर जागेवर असेल. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. प्रकल्पाचे भूमिपूजन अजित पवार यांनी ऑनलाइन केले, मात्र, आमदार लांडगे समर्थकांनी प्रस्तावित जागेवर कोनशिला पूजन केले. गोपाळ भालेकर, शांताराम भालेकर, रमेश भालेकर, संभाजी भालेकर, दत्तात्रेय नखाते, बंडू भालेकर, रामदास मोरे, अस्मिता भालेकर, वैशाली भालेकर, सुषमा पाटील, नीलेश भालेकर, शरद भालेकर, सोमनाथ मेमाणे, शंकर भालेकर, प्रमोद भालेकर, अमोल भालेकर, पंकज आवटे, युवराज भालेकर, सूरज काळोखे, महेश कुडपणे, महेश भालेकर, संपत भालेकर, भानाशेठ भालेकर, पांडुरंग भालेकर, पांडाभाऊ साने, दिनेश भालेकर, अमोल वाळुंज, किरण नखाते, रामदास कुटे, अजित भालेकर, बंटी भालेकर, सोन्या भालेकर, संपत बाठे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा, भामा आसखेड प्रकल्प ‘जलसंजीवनी’ ठरणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास आहे. जैवविविधता प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे. हा प्रकल्प
पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतील, असा विश्वास वाटतो.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.