पिंपरी-चिंचवड

बाश्री ब्लास्टर्स संघाला जेतेपद

CD

पिंपरी, ता. ६ ः राजस्थान रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कैलाश गट्टानी यांच्या सन्मानार्थ लायन्स क्लब ऑफ तळवडे प्राइडच्यावतीने मोशी येथे आयोजित ५० वर्षांवरील पुरुषांसाठी क्रिकेट स्पर्धेत बाश्री ब्लास्टर्स संघ ‘कैलास गट्टानी करंडका’चा मानकरी ठरला.
प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ.दीपक शहा यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी माजी रणजीपटू कैलास गट्टानी, लायन्स क्लब तळवडे प्राईडचे अध्यक्ष कैलाश पारिख, वसंत कोकणे, क्रिकेट स्पर्धा समन्वयक विजय अगरवाल, क्रीडा संचालक शिरीष भोपे, वसंत गुजर, डॉ.अशोक अगरवाल, श्रीधर प्रभू, योगेश वाके, रतन खारोल आदी उपस्थित होते.
लवास रॉयल संघ उपविजेता ठरला. ओम व्हीसीसीए नागपूर आणि बीकेसी लायन यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
यावेळी उत्कृष्ट खेळाबद्दल भूषण देशपांडे (मालिकावीर), प्रशांत तुपे (सामनावीर), गणेश कुदळे (उत्कृष्ट फलंदाज), मनोहर पाटील (उत्कृष्ट गोलंदाज), भालचंद्र कुलकर्णी (फायटर ऑफ मॅच) अशी पारितोषिके देऊन खेळाडूंना गौरविण्यात आले.
यावेळी अमानी नांदल, सुहासिनी कांदल, ईश्वरी अवसरे, भाविका अहिरे, संतोष चव्हाण, सारस जोगी या उदयोन्मुख खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला.
धावफलक -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIचा FIR; ठाकरे पिता-पुत्रांसह रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया यांच्या चौकशीची मागणी

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT