पिंपरी-चिंचवड

घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; तेरा लाखांचा ऐवज जप्त

CD

पिंपरी, ता. ५ : घरफोडी करणारा सराईत चोरटा जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (रा. स्टार आहूरा सोसायटी, आंबेगाव, पुणे) याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून तेरा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्मिता अमोल बोत्रे (रा. श्री हाईट्स, जुनी सांगवी) यांच्या घरात लोखंडी कपात फोडून आठ लाखांचा ऐवज लंपास केला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फूटजवरून हा गुन्हा जयवंत गायकवाड याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याला चिंचवड येथील स्मशानभूमी परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड व पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत सत्तरपेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो काहीही कामधंदा करीत नसून, पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी तो राहण्याचे ठिकाण बदलून वेषांतर करून वावरत असतो. त्याने सांगवी, पिंपरी हद्दीत घरफोडीतील सोन्याचे दागिने त्याची पत्नी विद्या हिच्या मदतीने सराफ व्यावसायिक गौरवकुमार श्यामसुंदर विजयवर्गीय (रा. आंबेगाव, पुणे) याला विक्री केल्याची माहिती दिली. दरम्यान, जयवंत याची पत्नी विद्या व चोरीचे दागिने घेणारा गौरवकुमार यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. या कारवाईत जयवंत यांच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, १३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT