पिंपरी-चिंचवड

दरवर्षी बालनाट्य संमेलन व्हावे अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची अपेक्षा

CD

पिंपरी, ता. ६ : ‘‘दरवर्षी बालनाट्य संमेलन झालेच पाहिजे. अर्थात बालनाट्य हाच खरा पाया आहे. बालनाट्यापासूनच मोठे कलाकार तयार झाले आहेत. नाट्य परिषदेच्या प्रत्येक शाखेने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी हवी ती मदत करण्यास तयार आहे, अशी ग्वाही अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी दिली. निमित्त होते शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या ‘बालनगरी’ रंगमंचाचे उद्घाटनाचे.

चिंचवड-भोईरनगर येथील बालनगरी रंगमंचाचे उद्‍घाटन शिर्के यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अभिनेत्री सविता मालपेकर, भाऊसाहेब भोईर, बोक्या सातबंडे नाटकातील बालकलकार आरुष बेडेकर, सिद्धा आंधळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.
शिर्के म्हणाल्या, ‘‘बालनाट्य हा फक्त रंगमंचावर येऊन केलेले सादरीकरण नसते. त्यामुळे मुलांमध्ये एक आत्मविश्वास येतो. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. मुलांमध्ये एकाग्रताही तेवढीच वाढते.’’

किलबिलाटाने गजबजली बालनगरी
नाट्य संमेलनात प्रथमच लहान मुलांच्या किलबिलाटाने बालनगरी गजबजली. ‘बालनगरी’त स्थानिक बाल कलाकारांच्या ‘गजरा नाट्यछटांचा’ यामधून बालकलाकारांनी विविध छटा सादर केल्या.
‘जॉबलेस जॉय’(क्लाऊन माईम) सादर करण्यात आले. दरम्यान, अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली.

‘बोक्या सातबंडे’ला मोठा प्रतिसाद
यावेळी ‘बोक्या सातबंडे’ हे नाटक चांगलेच रंगले. यास बालरसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भूमिकेतील सहजता आणि बालवयात असलेले रंगभूमीवरील पक्के भान हे नोंद घेण्याजोगे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT