पिंपरी-चिंचवड

वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हावीत शरद पवार यांची भावना, रंगभूमीसाठी विशेष अनुदानाची मागणी वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हावीत : शरद पवार

CD

पिंपरी, ता. ६ : ‘‘नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे. निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत,’’ अशी भावना शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
शरद पवार यांनी व्यक्त केली. रंगभूमीला विशेष अनुदान राज्य सरकारने दिले पाहिजे. तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, तिकीट दरात कपात व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पवार म्हणाले, ‘‘चित्रपटसृष्टीआधी हजारो वर्ष सर्वाधिक प्रभावी माध्यम ही रंगभूमी होती. मात्र, आता जवळपास सर्व निर्माते, कलाकार हे हिंदी चित्रपटाकडे वळत आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी ओस पडत आहे. ’’

आमच्यावरील आरोप दूर ः सामंत
उदय सामंत म्हणाले, ‘‘राजकारणी नेहमी नाट्य संमेलनात हस्तक्षेप करतात, असा आरोप व्हायचा. मात्र, प्रशांत दामले यांनी राजकारणीदेखील कलाकार असल्याचे सांगून, आमच्यावरील आरोप दूर केला.’’

नाट्यविभागाला अनुदान मिळावे ः पटेल
संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘‘राज्याच्या प्रत्येक विद्यापीठात नाट्य विभाग आहे. मात्र, त्यासाठीचा खर्च त्यांनीच उभा करायचा आहे. हा खर्च पाच ते सात कोटी रुपयांचा आहे. प्रत्येक विद्यापीठाला तो झेपणारा नाही. यामुळे राज्य सरकारने प्रत्येक विद्यापीठाच्या नाट्य विभागाला अनुदान दिले पाहिजे.’’

कलाकारांनी पुढे यावे ः गज्वी
प्रेमानंद गज्वी म्हणाले, ‘‘आपल्या आजूबाजूला वेगवेगळे प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. त्यातून कुरूपता निर्माण झाली आहे. तिला दूर करण्याचे काम कलेशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही. त्यामुळे कुरूपतेला दूर करण्यासाठी कलाकारांनी पुढे यावे.’’

प्रेक्षकांची पुढील पिढी तयार व्हावी ः दामले
पुढची दोनशे वर्षे मराठी नाटक जगवायचे असतील तर प्रेक्षकांची पुढची पिढी तयार होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीला नाटक पाहण्याची सवय लावावी, अशी अपेक्षा प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.

नाट्यक्षेत्राला विधानपरिषदेत संधी द्यावी : भोईर
पिंपरी चिंचवड शहरात नाट्यसंकुल असावे व आमचे विधानपरिषदेमध्ये एक प्रतिनिधित्व असावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. हे प्रतिनिधित्व देताना, त्या व्यक्तीची राजकीय पार्श्‍वभूमी न पाहता कलात्मक वाटचाल पहावी, असे त्यांनी नमूद केले.

नाट्यगृहांची भाडेवाढ मागे

पिंपरी-चिंचवड शहरातील पाचही नाट्यगृहांच्या भाडेवाढीचा प्रश्‍न प्रशांत दामले यांनी भाषणात मांडला व भाडेवाढ रद्द व्हावी, अशी मागणी केली. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी आयुक्त शेखर सिंह यांना बोलावून काही सूचना केल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषणात नाट्यगृहाचे भाडे जुन्या दरानुसार करण्याचा आदेश दिला. उद्‍घाटन सोहळा संपल्यानंतर अवघ्या एक तासात महापालिकेने पूर्वीप्रमाणेच भाडे आकारण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत पोचले.
---------------------------
अजित पवार, सांस्कृतिकमंत्री अनुपस्थित
उपमुख्यमंत्री अजित पवार नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला अनुपस्थित राहिले. त्यामुळे नाट्यसंमेलनाच्या मंडपात त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली. अजित पवार यांच्यासोबतच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील गैरहजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT