पिंपरी-चिंचवड

अध्यक्षांच्या कारकिर्दीला ‘नांदी’तून उजाळा

CD

पिंपरी, ता. ६ ः नाट्य संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘नांदी’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यात आजवर झालेल्या १०० नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला आहे.
या सर्व नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांचे फोटो, एका नाट्यरसिकांकडे असणाऱ्या १९६६ पासून नाटकाच्या तिकीट संग्रहाचे कोलाज, पं. नंदकिशोर कपोते, लावणी सम्राज्ञी संजीवनी मुळे - नगरकर यांच्यासह राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह, नाटककार व दिग्दर्शक अभिराम भडकमकर आदींचे लेख ‘नांदी’ मध्ये आहेत.
याशिवाय मधू जोशी, डॉ. वंदना गांगुर्डे यांचा ‘संगीत रंगभूमी व मराठी नाटक’ हा लेख, राज्य नाट्य स्पर्धेवर प्रकाश टाकणारा पी. डी. कुलकर्णी यांचा लेख याशिवाय वसंत अवसरीकर, भाऊसाहेब भोईर यांचेही लेख या स्मरणिकेचे वैशिष्ट्य आहेत.
या स्मरणिकेची संपूर्ण जबाबदारी ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नियामक मंडळाचे सदस्य सुहास जोशी यांच्यावर सोपवण्यात आली होती. स्मरणिकेच्या तयारीसाठी तीस दिवसांपेक्षाही कमी दिवस मिळाले. मात्र अत्यंत कमी वेळात आम्ही हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT