पिंपरी-चिंचवड

पिंपळे निलखहून डेक्कन, स्वारगेट बस सुरू करण्याची मागणी

CD

पिंपरी, ता. १२ : पिंपळे निलख येथील पीएमपीएमएल मुख्य बस स्थानकापासून डेक्कन, स्वारगेट तसेच विशालनगर येथून हडपसर येथे नियमित बस सुरू कराव्यात. यासह विश्रांतवाडी मार्गाच्या बसची संख्या वाढविण्याची मागणी पिंपळे निलख येथील ज्येष्ठ नागरिक गोविंद गायकवाड यांनी केली आहे.

पूर्वी येथून सुरू असलेल्या डेक्कन, स्वारगेट तसेच हडपसर या मार्गाच्या बस कोविड काळात बंद केल्यानंतर पुन्हा सुरू केल्या नाहीत. केवळ विश्रांतवाडी (बस क्रमांक १२६) ही बस चालू आहे. पण या बस अतिशय जुन्या अन् खिळखिळ्या असून रस्त्यात कुठेही बंद पडतात. या मार्गावरील बसही कमी केल्याने पिंपळे निलख किंवा विशालनगर येथील प्रवाशांना इच्छितस्थळी जाणे अवघड होत आहे. त्याबाबत माजी नगरसेवक अन् सामाजिक कार्य करणाऱ्यांना अनेकदा सांगूनही आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही. तरी संबंधित पीएमपीएमएल प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन नागरिकांची अडचण दूर करावी. तसेच विश्रांतवाडीच्या बस सुस्थितीत ठेवाव्यात, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT