पिंपरी-चिंचवड

दफनभूमीतील माती हटविण्यावरून दोन गटांत हाणामारी

CD

पिंपरी, ता. १० : दफनभूमीतील माती बुलडोजरने हटविण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना निगडी ओटास्कीम येथे घडली. या प्रकरणी, निगडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून सुमारे ५० हून अधिक जणांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
रिझवान इक्बाल शेख (रा. ओटास्कीम, निगडी) यांनी या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, इम्रान मुकरताल, गुड्डूलाल मुकरताल, हैदर शेख, रज्जाक मुकरताल, वाहिद मुकरताल, अब्दुल मुकरताल, सलीम शेख, साहिल अल्लाबक्ष मुकरताल, सादिल मुकरताल, मुजाहिद मुकरताल, मोसिम शेख (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) व इतर दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दफनभूमीतील माती बुलडोजरने हटविण्यास विरोध असल्याने आरोपींनी इम्रान शेख, फिरोज शेख मोहम्मदअली सय्यद यांना मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी बोर्ड मारून दुखापत केली. तर इम्रान इस्माईल मुकरताल (रा.ओटास्कीम, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आलम कुरेशी, इम्रान खान, रिझवान शेख, इक्बाल शेख, फिरोज, अब्दुल्ला, मजीद शेख, मोहम्मद साद, अब्दुल्ला साद, इम्तियाज खान, हर्षद खान, अमीन शेख, अली सय्यद शेख, बंदेअली सय्यद शेख, इम्तियाज खान, मेहबूब शेख, मोसिन उर्फ अजीमोद्दिन शेख, शफिक शेख, नाजीम शेख, तंजीम शेख (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) व इतर पाच ते सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दफनभूमीत माती बुलडोजरने हटवण्यास फिर्यादी यांचा विरोध असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी फिर्यादी तसेच राजू शेख, वाहिद मुकरताल यांना लाथाबुक्क्यांनी व कोयत्याने मारहाण करून जखमी केले.

ठाण्याच्या आवारातच हाणामारी; पोलिसाला धक्काबुक्की
एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी निगडी पोलिस ठाण्यात आलेल्या दोन्ही गटांतील लोकांनी पोलिसांसमोरच मारामारी केली. त्यांना ‘असे करून नका’, असे सांगत असताना त्यांनी पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.
पोलिस शिपाई अजित गोंदके असे धक्काबुक्की झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बंदेअली अख्तरअली सय्यद (वय ३३), अक्रम नफीस शेख (वय ३४), शाहरुख सलाउद्दीन शेख (वय ३०), फिरोज आयुब खान (वय ३५), मोहमंद अब्दुल्ला शेख (वय २५) यांना अटक केली असून इतर जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT