पिंपरी-चिंचवड

तापमानाचा पारा उद्योगनगरीत वाढला चिंचवडमध्ये ४०.८ अंश सेल्सियसची नोंद

CD

पिंपरी, ता. २५ ः राज्यात सर्वत्र उन्हाचा चटका वाढलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणांचे तापमानही ४० अंश सेल्सिअसच्या आसपास येऊन ठेपले आहे. मात्र, इतर भागांच्या तुलनेत पिंपरी चिंचवड शहर व परिसरात तापमानाचा पारा अधिक असल्याचे समोर आले आहे.
गेल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर हे तापमान काहीसे कमी झाले होते. मात्र, पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढल्याने गुरुवारी (ता. २५) चिंचवडचे तापमान ४०.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. पुण्यातील शिवाजीनगरच्या तुलनेत जास्त आहे. गुरुवारी शिवाजीनगरचे तापमान ३९.४ एवढे नोंदविण्यात आले.
गेल्या आठवड्यात शहरात या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र, पुण्याचे आतापर्यंतचे सरासरी तापमान हे सर्वाधिक म्हणजेच ४१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आलेले आहे. एकूणच उद्योगनगरीतील उद्योगांची वाढती संख्या, वाढलेली वाहने यांच्यामुळे वाढलेले प्रदूषण व वाढलेले शहरीकरण, कमी होत असलेली वृक्षांची संख्या यामुळे शहरात उच्चांकी तापमानाची नोंद होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

गुरुवारी कमाल तापमान
चिंचवड ः ४०.८
तळेगाव ः ३९.८
राजगुरुनगर ः ४०.७
दापोडी ः ३७.८
लोणावळा ः ३६.६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT