थेरगाव, ता. १७ ः येथील जीवन कला मंदिरात नुकतेच सरस्वतीदेवी पूजन झाले. अडीच ते सहा वर्षे वयोगटातील ४० बालक-बालिका, पालक, पूर्णवाद उपासक व नागरिक यावेळी उपस्थित होते. वेदमूर्ती रेणुकादास मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती मातेची पूजा करण्यात आली. डॉ लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शलाका पारनेरकर, विभावरी कुळकर्णी, रणजितसिंह सिसोदिया उपस्थित होते. प्रा. उर्मिला अघोर, विवेक नानिवडेकर, विनीत वेलणकर, सुशील देशपांडे, रश्मी देशपांडे, रश्मी जोशी, स्वाती कुर्डूकर यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. विवेक वेलणकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.