पिंपरी-चिंचवड

एक झाडं लावू बाई, दोन झाडं लावू साहित्यिकांचा भोंडला; लेखकांचा सहभाग

CD

पिंपरी, ता. १६ ः ‘एक झाडं लावू बाई, दोन झाडं लावू, तुळस, झेंडू, गवती चहा लावू औषधी झाडे माझ्या अंगणात, भोंडला खेळू बाई भोंडला खेळू, अशी सामाजिक व पर्यावरणाचा संदेश देणारी गाणी गात महिला साहित्यिकांसोबत कवी, लेखकांनी भोंडल्यात सहभाग घेतला.
दिलासा संस्थेतर्फे, चिंचवड येथील समरसता गुरुकुलम येथे वरील भोंडला झाला. या भोंडल्यातील गीते ही आजच्या सद्यःस्थितीवर भाष्य करणारी होती. पुरुष साहित्यिकांनी महिला साहित्यिकांसोबत भोंडल्यात घेतलेला सहभाग हे त्याचे वैशिष्ट्य ठरले. कवी सुरेश कंक भोंडला गीत सादर करताना रक्तदानाचे महत्त्व सांगितले. संगीता सलवाजी आपल्या भोंडला गीतातून औषधी झाडे लावण्याचा संदेश दिला. कवयित्री राधाबाई वाघमारे यांनी अंधश्रद्धेवर प्रहार करणारा भोंडला सादर केला.
जीवनाची वाट आव्हानाची ताट, आज कोणतं आव्हान आलं गं बाई.. कसं तू पेललं ते सांग बाई..
चूल नी मूल सांभाळून ऑफिसला मला जायचं गं बाई.. लवकर उठून, स्वयंपाक करून छोट्याला शाळेत पाठवायची घाई.. गाडीला किक मी मारते गं बाई.. या गीतातून कवयित्री वर्षा यांनी नोकरदार महिलांच्या लगबगीचे वर्णन केले. अशोक महाराज गोरे, नारायण कुंभार, शोभा जोशी, कवी प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी आदी यावेळी उपस्थित होते. समरसता गुरुकुलमचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी फेर धरून भोंडला गीते म्हणण्यासाठी साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balendra Shah India Visit : नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा भारत दौऱ्यावर, राष्ट्रपती मुर्मू अन् पंतप्रधान मोदींना देणार अनोखी भेट

Harshit Rana Fight: चल निघ! भारत पाकिस्तान सामन्यात भरमैदानात राडा; हर्षित राणा पाकिस्तानी फलंदाजांशी भिडला, नेमकं काय घडलं?

Sharda Dnyanpeetham : ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तींचे आयुष्य कृतार्थ होते आणि समाजालाही त्यांच्या कार्याचा लाभ मिळतो, सद्गुरू शिरीष कवडे यांचे पुण्यात प्रतिपादन

भारताशी बिघडलेले संबंध सुधारणार? नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

बापरे! भर स्टेजवर चाहतीने दिलजीत दोसांझला केलं kiss; पुढच्याच क्षणी सिंगरने असं काही म्हटलं की...

SCROLL FOR NEXT