पिंपरी-चिंचवड

डॉक्टरच्या छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या

CD

पिंपरी, ता. १७ : लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरने केलेल्या छळाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. शंतनू शरद चोप्रा (वय ३०, रा. संगमवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी चोप्रा हा पुण्यातील एका नामांकित खासगी रूग्णालयात नोकरीला आहे. तर, मृत तरुणी एका खासगी कंपनीत एचआर विभागात काम करीत होती. डॉ. चोप्रा याने फिर्यादी यांच्या मुलीला लग्न करण्याचे वचन दिले. त्यानंतर तिला वारंवार मानसिक त्रास दिला. २३ सप्टेंबर २०२४ ला त्याने फिर्यादी यांच्या मुलीला त्याच्यासोबत राहण्यासाठी बोलावले. त्यानंतर तिच्याशी भांडण करून मध्यरात्री बारा वाजता तिला घराबाहेर काढले. या छळाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने तिच्या राहत्या घरी बावधन येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. चोप्राच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यानुसार बुधवारी (ता. १६) रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पडीक जमीनीबद्दलच्या विधानाचा विपर्यास, बावनकुळेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, शेतकऱ्यांशी संबंध नाही

गोकुळ माजी संचालकाच्या मुलाच्या कारने उडवलं, दोन भावांचा मृत्यू; मुलाला अटक

फेअरनेस क्रीम वापरणं पडलं महागात; किडनीचा आजार, पायावर सूज... गायकाने सांगितला धक्कादायक अनुभव

Gold Rate Update: सोनं आणखी स्वस्त होणार की महागणार? खरेदीआधी 'या' 3 तारखा लक्षात ठेवा

चिमुकल्याने डान्ससाठी हट्ट धरला अन् रितेश देशमुखही थिरकला! जेनिलिया बघतच राहिली; VIRAL VIDEO

SCROLL FOR NEXT