पिंपरी-चिंचवड

भोसरी विधानसभेतील बूथ अध्यक्षांना प्रशिक्षण राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार बूथ प्रमुखांचा मेळावा

CD

पिंपरी, ता. १ : राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा आयोजित बूथ प्रमुख संवाद मेळावा भोसरी येथील क्वालिटी सर्कल फोरम हॉल येथे झाला. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी त्याचे आयोजन केले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील युवक पदाधिकारी, महिला आणि विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी भोसरी विधानसभेतील ४६४ बूथ समितीची बांधणी केली. बूथ अध्यक्षांना प्रशिक्षण देण्यात आले. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, ‘‘ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असून, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना ईडी, सीबीआयच्या धाकावर भाजपमध्ये घेणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीविरुद्ध सामान्य नागरिक पेटून उठलेला आहे. त्यामुळे शिरूर लोकसभेची ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे.
निरीक्षक प्रकाश म्हस्के म्हणाले, ‘‘नेते, पदाधिकारी जरी भाजपच्या गळाला लागले असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आणि मतदार हा केवळ शरद पवार यांच्यासोबतच आहे.’’ विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, वैद्यकीय सेल प्रदेशाध्यक्ष गौतम आगा यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, स्वप्नील भैय्या गायकवाड, सागर कोल्हे, सागर तापकीर, शिरीष जाधव आदी उपस्थित होते.
फोटोः 11153

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

SCROLL FOR NEXT