पिंपरी-चिंचवड

मिळकतींचे बिल वाटपासाठी ‘सिद्धी’ प्रकल्प

CD

पिंपरी, ता. ४ ः महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत बचत गटातील महिलांद्वारे मिळकतकर बिलांचे वाटप करण्याचा निर्णय महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाने घेतला आहे. त्याला ‘सिद्धी २.०’ प्रकल्प असे नाव दिले असून, महिलांमार्फत घरोघरी बिलांचे वाटप केले जाईल. गेल्यावर्षीही हा प्रकल्प राबवला होता. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत ५० टक्के अर्थात ४४७ कोटी रुपये कर वसूल झाला होता. शिवाय, महिलांना रोजगारही मिळाला होता.
शहरात सहा लाख २५ हजार निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र व मोकळ्या जमिनी अशा मालमत्ता आहेत. त्यांच्यावर करआकारणी करून संकलनाची जबाबदारी महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाची आहे. त्यासाठी महापालिका आर्थिक वर्षाच्या प्रारंभी अर्थात एप्रिल महिन्यातच मिळकतकर बिलचे वाटप करते. त्याची जबाबदारी गेल्या वर्षी महिला बचत गटांकडे दिली होती. त्यांनी घरोघरी जाऊन बिले पोहोच केली. यावर्षीही महिलांद्वारेच बिलांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या महिलांना प्रशिक्षण दिले. मालमत्ता कराविषयी मूलभूत माहिती, बिल नेमके कसे असते?, बिलांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो?, याची माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

कमाल ४० हजार रुपये मानधन
मिळकतकराचे बिल वाटप करण्यासाठी महापालिकेने महिलांना गेल्या वर्षी एका बिलासाठी १५ रुपये दिले होते. यावर्षी प्रतिबिलासाठी २० रुपये दिले जाणार आहेत. प्रत्येक महिलेला दोन हजारांपेक्षा जास्त बिले वाटपाचे काम देण्यात येणार नाही. जेणेकरून सर्व महिलांना बिल वाटपाचे मानधनाची रक्कम समान मिळेल. त्यामुळे प्रत्येक महिलेने दोन हजार बिलांचे वाटप केल्यास २० रुपये प्रमाणे त्यांना ४० हजार रुपये मानधन मिळेल.

बिलांचे वाटप दीड महिन्यात पूर्ण
मिळकतकरांच्या कोऱ्या बिलांची छपाई सुरू झाली आहे. ती १० एप्रिलपर्यंत करसंकलन विभागाला मिळतील. १५ एप्रिलपर्यंत प्रत्येकी दोन हजार बिलांचा एक असे गठ्ठे तयार केले जाणार आहेत. त्यानंतर बिले बचत गटातील महिलांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. बिलांचे वाटप १५ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत केले जाणार आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT