पिंपरी-चिंचवड

वारजेमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीला पिंपरीत अटक

CD

पिंपरी, ता. १० ः वारजे माळवाडी येथे मतदान संपल्यानंतर गोळीबार करणाऱ्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केले. सिद्धाप्पा मलिकार्जून यळसंगीकर (वय ३५, रा. यळसंगी, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक, सध्या रा. कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे. वारजे माळवाडी परिसरात मंगळवारी (ता. ७) मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर रात्री या परिसरातील रामनगर येथे काही जणांनी हवेत गोळीबार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. गोळीबारानंतर आरोपी पसार झाले. दरम्यान, बुधवारी (ता. ८) रात्री पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ एकजण पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या युनिट दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान, सिद्धाप्पा याला पोलिस आल्याची चाहूल लागताच तो कमरेचे पिस्तूल काढून फायरिंग करण्याच्या व उडी मारून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिस अंमलदार अजित सानप व नामदेव कापसे यांनी झडप घालून शिताफीने पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने साथीदारांसह वारजे येथे गोळीबार केल्याची कबुली दिली. तसेच, सिद्धाप्पा याच्यावर कर्नाटकातील सिंदगी पोलिस ठाण्यात खुनाचे दोन गुन्हे दाखल असून सध्या तो जामिनावर सुटलेला आहे. पुणे येथे तो कामासाठी आलेला असताना दहशत निर्माण करण्यासाठी त्याने हा प्रकार केला. त्याच्याकडून एक पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले. सिद्धाप्पा याने पिस्तूल व काडतूस कोठून आणले व कोणाच्या सांगण्यावरून गोळीबार केला याबाबतचा तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT