पिंपरी-चिंचवड

कामगाराने केली मालकाच्या घरात चोरी

CD

वाकड : दुकानात काम करणाऱ्या कामगाराने मालकाच्या घरातून ऐंशी हजारांचा ऐवज चोरल्याची घटना काळेवाडीतील विजयनगर येथे घडली. याप्रकरणी हर्ष रवी कुंदनानी (रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा कामगार मोहम्मद वसीम शरीफ सिद्दीकी (वय २४, रा. पिंपरी, मूळ- मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हा फिर्यादी यांच्या दुकानातील कामगार असून, त्याने गाडीमध्ये ठेवलेल्या चावीने फिर्यादीचे घर उघडले. घरातील सामान अस्ताव्यस्त करून बेडरूममधील कपाटात ठेवलेली पन्नास हजारांची रोकड व तीस हजार रुपये किमतीची दुचाकी घेऊन आरोपी पसार झाला.

बनावट स्पेअरपार्ट विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा
थेरगाव : दुचाकीचे बनावट स्पेअरपार्ट विक्रीप्रकरणी गोविंद वनाराम सीरवी (वय ३०, रा. तापकीर चौक, काळेवाडी, मूळ- राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार थेरगाव येथील क्रांतीनगर येथे घडला. याप्रकरणी रेवणनाथ विष्णू केकान (रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी होंडा मोटार सायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. ली. कंपनीचे एकूण तीन लाख ४९ हजार ७४१ रुपये किमतीचे बनावट स्पेअर पार्ट्‍स व होंडा नावाचे प्लास्टिक स्टिकर विक्रीसाठी ठेवले. ते ओरिजिनल असल्याचे भासवून ग्राहक व कंपनीची फसवणूक केली.

ताथवडेत सहा लाखांची वायर चोरीला
पिंपरी : कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट येथून सहा लाख रुपये किमतीची फ्लेक्झिबल कॉपर वायर चोरीला गेल्याची घटना ताथवडे येथे घडली. याप्रकरणी योगेश दत्तात्रेय शिंदे (रा. वडगाव खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT