पिंपरी-चिंचवड

प्रवेश परीक्षांबाबत उद्या चर्चासत्र

CD

पिंपरी, ता. १० ः ‘सकाळ विद्या’ व ‘एक्‍सिड’च्या (एक्‍सलंट एज्युकेशन) वतीने अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विज्ञान क्षेत्रातील करिअर, प्रवेश परीक्षांबाबत चर्चासत्र आयोजित केले आहे. रविवारी (ता. १२) सकाळी नऊला चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हे चर्चासत्र होणार आहे. यात राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा आणि एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा परीक्षांची तयारी कशी करावी?, त्यांचा अभ्यासक्रम, याबाबत बहुतांश विद्यार्थी व पालकांना माहिती नसते. अशा परीक्षांसह अभियांत्रिकी, वैद्यकीय व विज्ञान क्षेत्रातील करियरच्या संधी व प्रवेश परीक्षांची कशी तयारी करावी? या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या चर्चासत्रात, अभियांत्रिकी, वैद्यकीय व विज्ञान शाखेतील शिक्षण आणि प्रवेश; राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी का व कशी करावी?; एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा अशा परीक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम, त्यांची तयारी; आगामी काळात अभ्यासक्रमात होणारे बदल; सहावी ते दहावीपासूनच तयारीला लागलो तर बारावीमध्ये अभ्यासाचा ताण कसा कमी होऊ शकतो. सीईटी, जेईई, नीट परीक्षांची तयारी, अभ्यासक्रमाचे नियोजन, बारावीनंतर अभियांत्रिकी व विज्ञान शाखेतील करिअरचे विविध पर्याय आणि त्यातील शिक्षण घेण्यासाठी देशातील नामांकित संस्था आयआयटी, एनआयटी, बीआयटी, व्हीआयटी, आयआयएससी, आयआयएसईआर, एनआयएसईआर व त्यांची प्रवेश प्रक्रिया याबाबतच्या शंकांचे निरसन चर्चासत्रातून होणार आहे. यामध्ये दहावी, अकरावी, बारावीसह सहावी ते नववीपर्यंतचे विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. त्यांना करिअर व समुपदेशन क्षेत्रातील २० वर्षांचा अनुभव असलेले प्रा. आशिष दुबे मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी व पालकांच्या करिअर व प्रवेश परीक्षांतील बदलांविषयीच्या सर्व शंका व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील.

काय?ः कधी? केव्हा? कुठे?
काय? ः स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रम तयारी
कधी? ः रविवारी १२ मे २०२४
केव्हा? ः सकाळी ९ वाजता
कुठे? ः : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
प्रवेश ः विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य
नावनोंदणी निश्चित करण्यासाठी संपर्क करा
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
संपर्क ः ८३७८९८७८३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT