पिंपरी-चिंचवड

कासारवाडीत वर्षीतप करणाऱ्या तपस्वींचा सन्मान

CD

पिंपरी, ता. ११ : कासारवाडी जैन श्रावक संघाच्यावतीने प. पू. गौतममुनिजी म. सा. आणि प. पू. चेतनमुनिजी म. सा. यांच्या सानिध्यात वर्षीतप करणाऱ्या तपस्वींचा सन्मान करण्यात आला. दोन्ही मुनिंनी वर्षीतप या पवित्र तपाचे महत्त्व विशद केले.
कासारवाडी येथील जैन स्थानकाजवळील पगारिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात वर्षीतप तपस्वी मोतीबाई लुंकड, सुमन गुगळे, सुनीता चोरडिया, लताबाई टाटिया, मंगल देसरडा, पुष्पा शिंगवी, विजया देसरडा आणि भवरलाल चोरडिया या आठ तपस्वींचा सत्कार करण्यात आला. तसेच तपस्वी प. पू. गौतममुनिजी यांचाही साधना सदन आणि कासारवाडी जैन श्रावक संघाच्या वतीने ‘आदर की चादर’ समर्पण करून सम्मान करण्यात आला. यावेळी साधना सदन श्री संघाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, पन्नालाल लुनावत, विजय धोका, आदेश खिंवसरा, विजय भटेवरा, नितीन ओस्तवाल तसेच सज्जनबाई बोथरा, चंचलबाई कोठारी, अशोक लुंकड, राजेंद्र कर्नावट, सुरेश धाडिवाल, जितेंद्र गुगळे, राजेंद्र बाठीया, सुनील कोठारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, पंकज कांकरिया, किरण भंडारी, मयूर पगारिया, स्नेहल भंडारी, संदीप कर्नावट, पंकज कटारिया, संदीप फुलफगर, अमोल मुथा आदींनी पुढाकार घेतला. श्री संघाचे माजी अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी प्रास्ताविक केले. श्रेयस पगारिया यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT