पिंपरी-चिंचवड

राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रेरणा पुरस्काराचे आज वितरण

CD

पिंपरी, ता. ११ ः अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पिंपरी-चिंचवड शाखा व महाराष्ट्र अंनिस ग्रंथदिंडी यांच्या वतीने दहा तरुण कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सन्मानपत्र व एक हजार रुपयांची पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे आज (ता. १२) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी अभिजित सोनावणे यांच्या ‘भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी डोक्यावर दुधाची बाटली ठेऊन सलग २१ तासात १०४.२ किलोमीटर चालल्याचा विश्वविक्रमाला ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या प्रीत्यर्थ या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे. देशमुख यांच्याकडून कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी, ही या पुरस्कारामागची कल्पना आहे, अशी माहिती विश्वास पेंडसे, विजय सुर्वे व शुभांगी घनवट यांनी दिली. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण, प्राची दुधाणे, दिनेश आदलिंग, डॉ. अभिजित सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT