पिंपरी-चिंचवड

मतदान केंद्र परिसरात मोबाईल बंदी निवडणूक निर्णय अधिकारी सिंगला यांची माहिती; गुन्हे दाखल होणार

CD

पिंपरी, ता. ११ ः मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) मतदान होणार आहे. त्यावेळी गैरप्रकार होऊ नये, कायदा-सुव्यवस्था राखली जावी, यासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांकडे ओळख मतदान चिठ्ठी (फोटो वोटर स्लीप) आणि निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या किमान एका पुराव्याची मूळ प्रत आवश्यक आहे. डिजिटल स्वरुपातील पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध असेल, प्रसंगी गुन्हे दाखल केले जातील, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.
मावळ मतदारसंघांतील मतदान केंद्रांवरील कामकाजासाठी नियुक्त मनुष्यबळाची तिसरी सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत झाली. यामध्ये २,८५२ मतदान केंद्राध्यक्ष, ८,५५६ मतदान अधिकारी व मतदान सहाय्यक आणि ७६ सूक्ष्म निरीक्षक असे ११ हजार ४८४ अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांना रविवारी (ता. १२) विधानसभा निवडणूक कार्यालयनिहाय निश्चित केलेल्या स्थळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर मतदान साहित्य त्यांच्याकडे सुपूर्त केले जाईल. सायंकाळपर्यंत ते नेमून दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी पोचतील.

मतदान केंद्रांवर सुविधा
प्रत्येक मतदान केंद्रांवर वैद्यकीय सुविधांसाठी डॉक्टरांची नियुक्ती असेल. पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, उन्हापासून बचावासाठी शेड, प्रतिक्षा कक्ष, प्रथमोपचार पेटी व ओआरएस सुविधा असेल. तसेच, ५० टक्के मतदान केंद्र वेब कास्टिंगद्वारे जोडली आहेत. संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून, तत्काळ समन्वय करण्यासाठी सात नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. त्यासाठी दोन उपजिल्हाधिकारी समन्वय अधिकारी असतील. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवून माहिती संकलन आणि जलद गतीने संवाद साधण्यासाठी तीन तहसीलदारांची नियुक्ती केली आहे. तक्रार निवारणासाठीही समन्वय अधिकारी नियुक्ती केले आहेत.

विविध पथकांद्वारे कामगिरी
मावळ लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात ४४ भरारी पथक, १९ तपासणी पथक, ३८ स्थिर सर्वेक्षण पथक, १२ व्हिडिओ सर्वेक्षण पथक, सहा कृती दलासह ईव्हीएम सुरक्षा पथक आणि इतर आवश्यक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत.

खर्चाची तिसरी तपासणी
उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तिसरी तपासणी शनिवारी झाली. खर्च अहवाल सादर न करणाऱ्या व खर्चामध्ये तफावत आढळलेल्या उमेदवारांना नोटीस दिली जाणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम ७८ अन्वये निवडणुकीच्या तारखेपासून ३० दिवसांत हिशोब दाखल करणे आवश्यक आहे.

मतमोजणीचे नियोजन
बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलातील वेट लिफ्टिंग हॉलमध्ये मतमोजणीची प्रक्रिया चार जून रोजी होईल. त्यासाठी १०८ टेबल असतील. एकूण १४४ मतमोजणीच्या फेऱ्या होतील. त्याचबरोबर टपाली मतदानासाठी चार व ईटीपीबीएससाठी एक असे पाच टेबल असतील. एकूण ११३ टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया होईल.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT