पिंपरी-चिंचवड

मावळ मतदारसंघातील अनेक प्रश्‍न रखडलेले महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांची टीका

CD

पिंपरी, ता. ११ : मावळ मतदारसंघांमध्ये यापूर्वी काही मंडळींनी ज्या घोषणा केल्या होत्या. त्या त्यांना पूर्ण करता आलेल्या नाहीत. मतदारसंघात अनेक प्रश्न रखडले आहेत. तळवडे-हिंजवडी नवीन मेट्रो मार्ग होणे गरजेचे आहे. तो न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. पनवेलसह घाटाखालील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये पिण्याचे पाणी, आरोग्याचा प्रश्न आहे. वाहतूक, मिळकतकराचाही प्रश्न आहे. औद्योगिक भागाचा ज्या प्रमाणात विकास व्हायला हवा, तेवढ्या प्रमाणात झाला नाही. पिण्याचे पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे, ते मिळत नाही. पनवेल शहरासह इतर तिन्ही मतदारसंघात शिक्षणाचा अभाव आहे, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
वाघेरे म्हणाले, ‘‘दहा वर्षे ज्या पक्षाने संधी दिली, त्याच पक्षाशी श्रीरंग बारणे यांनी गद्दारी केली. मला कोणत्या पक्षातून आले, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे. ते स्वतः काचेच्या घरात राहतात. कारण, आपण कुठे होतो. कसे खासदार झालो, हे त्यांनी पाहिले पाहिजे. उद्भव ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे शिवसेना पक्षाने त्यांना दोन वेळा खासदार होण्याची संधी दिली. त्यांच्यासोबत त्यांनी गद्दारी केली आहे. ते यापूर्वी काँग्रेसमधूनच शिवसेनेत आले होते. मी देखील स्वाभिमानाने पक्ष बदलून इकडे आलो. विचार आवडल्यामुळे त्यांच्यासोबत आहे. मागच्या दाराने कुठेही गेलो नाही. कोणालाही फसवलेले नाही.’’
खासगी संस्थेसह इतर माध्यमातून स्थानिक मुले शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे आमचे ध्येय आहे. कामगार, शेतकरी आदींवर अन्यायकारक असणाऱ्या कायद्यामध्ये बद्दल करण्यासाठी आग्रही आहे. प्रचारात फिरताना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. सहाही मतदारसंघात मताधिक्य मिळेल, असा दावा वाघेरे यांनी केला.


चौकट
‘टीडीआर’बाबतच्या पत्रांचे काय झाले?
महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या चुकीच्या कामांना आळा घालणे, ही प्रत्येक लोकप्रतिनिधीचीदेखील जबाबदारी असते. खासदारांनी टीडीआर, स्मार्ट सिटीसारख्या कितीतरी कामांबाबत महापालिकेकडे, शासनाकडे पत्रे दिली होती. त्या पत्राचे काय झाले. त्या प्रकरणावर खासदार पुन्हा का बोलले नाहीत ? असा प्रश्न वाघेरे यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना केला. या बाबत खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT