पिंपरी-चिंचवड

कुटुंबाला प्रेमाचे संस्काराचे कुंपण आवश्यक ः कुलकर्णी

CD

पिंपरी, ता. १२ ः ‘‘आपले कुटुंब सुरक्षित करण्यासाठी प्रेमाचे, संस्काराचे कुंपण घराला असणे गरजेचे आहे. घरात मुलांवर लक्ष ठेवणारी पिढी कुटुंबापासून तोडली गेली आहे. कुटुंबातील सुदृढ संवाद लोप पावत चाललेले आहेत,’’ असे मत सुशील कुलकर्णी यांनी मांडले.
महाराष्ट्र ब्राह्मण सभा यांच्या वतीने परशुराम जयंतीच्या निमित्ताने ‘आमची मुलं सुरक्षित आहेत का?’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्राधिकरण येथील सावरकर मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र ब्राह्मण सभा यांच्या वतीने पाच मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतही दिली गेली. माझी मुलगी माझा अभिमान या अंतर्गत ज्या एकुलती एक मुली सासू-सासऱ्यांसोबत आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करीत आहेत, अशा मुलींचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल व्यास, अभिजित अग्निहोत्री, लेखक विजय शेंडगे डॉ. शरदचंद्र लोहोकरे, माजी नगरसेविका भारती फरांदे, माजी उपमहापौर शैलजा मोरे आदी उपस्थित होते. सचिन बोधनी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शर्वरी येरगट्टीकर, सुभाष फाटक, वृंदा गोसावी, मनीषा नातू, वैदही पटवर्धन, अश्विनी मेहरुनकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT