पिंपरी-चिंचवड

जोरदार पावसामुळे साळुंब्रे पूल पाण्याखाली

CD

सोमाटणे, ता. १२ ः जोरदार पावसामुळे साळुंब्रे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद असून, पावसाने वीटभट्टी, फुलशेती, कांदा, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे.

शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने पवनेला आलेल्या पाण्यामुळे साळुंब्रे साकव पुलावरील रस्ता वाहून गेला असून, सध्या पवना धरणाच्या वीजप्रकल्पातून सोडलेले पाणी व पावसाचे पाणी एकत्र झाल्याने ते पुलावरील रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे आज दिवसभर साळुंब्रे पुलावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना दुसरा जवळचा मार्ग नसल्याने जीव धोक्यात घालून ते पुलावरील याच रस्त्याने धोकादायक प्रवास करत आहेत.

या पावसामुळे गहुंजे येथील शेतकऱ्यांची तोडणीला आलेली फुले भिजल्याने बाजारभाव चांगले असतानाच फुलांचे नुकसान झाले. वादळी वारा व जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांची काढणीला आलेली व काढणी केलेल्या बाजरीचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा काढणी केलेला कांदा शेतातच भिजला आहे. अचानक आलेल्या पावसाने विटा व मडकी भिजल्याने वीटभट्टी मालक व कुंभार समाजाचे नुकसान झाले आहे. तसेच हा
पाऊस ऊस, भुईमुगास उपयुक्त ठरला असून, पावसाने हवेतील उकाडा कमी होऊन, हवेत गारवा निर्माण झाला आहे. जोरदार पावसाने द्रुतगती व पुणे-मुंबई महामार्गावर काही ठिकाणी माती, मुरम वाहून आल्याने रस्त्यावर चिखल झाला.

PNE24U19235, PNE24U19236

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT