पिंपरी-चिंचवड

मोशी, चऱ्होली परिसरात पावसाची हजेरी

CD

पिंपरी, ता.१२ ः शहराच्या चऱ्होली, चोविसावाडी, डुडूळगाव, मोशी या उपनगरांसह आळंदीमध्ये सकाळी सात वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली. मोशी उपबाजारासमोरील दुभाजकातील खांब उन्मळून पडला. महापालिकेकडून विविध वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. त्या खोदकामाच्या जागेवर सगळीकडे चिखल झाला.
दिवसेंदिवस तप्त उन्हामुळे जीवाची काहिली होत असताना शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस सुमारे दीड तास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने शहराला चांगलेच झोडपले. त्यामुळे, नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला. पण, शहरातील चिंचवड एल्प्रो लिंक रोड, रावेत भोंडवे कॉर्नरवर, मोरवाडी- सम्राट चौक या परिसरात खोलगट भागात पाणी साचले. शहरात नव्याने वाहिन्‍या टाकण्यासाठी खोदकाम केलेले आहे, त्याठिकाणी सगळा चिखल झाला आहे. तसेच खोदलेल्‍या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.

सुमारे दीड तास हजेरी
सकाळी सात वाजता रिमझिम पावसाला सुरवात झाली. त्यानंतर, अकरा वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली. साडेअकराच्या सुमारास चांगलेच अंधारून आले होते. पाठोपाठ मुसळधार पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस दुपारपर्यंत कायम होता. सुमारे दीड तास पावसाने हजेरी लावली. यामुळे शहराच्या खोलगट भागात पाणी साचले. पाऊस येताच शहरातील वीज गेली आणि पाऊस थांबताच परत आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT