पिंपरी-चिंचवड

निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज

CD

पिंपरी, ता. १२ : लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासह
कायदा - सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व पोलिस यंत्रणा सज्ज आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही कंबर कसली. सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यासह पथसंचलन करण्यात आले. रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यासह इतरही गुन्हेगारांची धरपकड सुरु केली. तडीपार, स्थानबद्ध यासह ‘मोका’ यासारख्या कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले. यासह आता सोमवारी होणारी मतदान प्रक्रियाही शांततेत पार पडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ४०७ मतदान केंद्र असून, एक हजार ७८७ बूथ आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राची पाहणी करण्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
आयुक्तालयाच्या हद्दीत दहा ठिकाणी नाकाबंदी असून, २४ भरारी पथके आहेत. आयुक्तालयांतर्गत असलेल्या सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक शीघ्र कृती दलाची तुकडी तैनात राहणार आहे. यासह गस्तही वाढविण्यात येणार आहे. तसेच आठ दंगा नियंत्रक पथकांसह केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या सहा तुकड्या तैनात असतील.
या बंदोबस्तासाठी आयुक्तालयाच्या बंदोबस्तासह बाहेरूनही अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यामध्ये ७४० पोलिस अंमलदार व सोळाशे होमगार्ड यांचा समावेश आहे.

‘‘ही निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. अतिरिक्त बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.

- विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड
--------------------------------

असा आहे बंदोबस्त

पोलिस उपायुक्त - ०६
सहायक पोलिस उपायुक्त - ११
पोलिस निरीक्षक व इतर अधिकारी - ३२५
पोलिस अंमलदार - ३९५८
होमगार्ड - १५५६
केंद्रीय सशस्त्र पोलिस बल - ६ तुकड्या
----------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT