पिंपरी-चिंचवड

तळवडेत कारखान्याला आग; साहित्याचे जळून नुकसान

CD

पिंपरी, ता. १२ : तळवडेतील गणेशनगर येथे दुधजन्य पदार्थांपासून आइस्क्रीम बनवणाऱ्या कारखान्याला आग लागली. यामध्ये कारखान्यासह एका वाहनाचे जळून नुकसान झाले.
या बाबत ज्ञानेश्वर भालेकर यांनी अग्निशमन केंद्राला माहिती देताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तळवडे उपअग्निशमन केंद्रासह प्राधिकरण, चिखली व मोशी उपअग्निशमन केंद्रांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. चार अग्निशमन गाड्यांसह २७ कर्मचाऱ्यांनी अवघ्या पंचवीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत दोन डीप फ्रिजर, आइस्क्रीम डेअरी उत्पादन, ग्लास ऑफ फ्रीजर, इन्सुलिटेड कंटेनर, संगणक, प्रिंटर, फर्निचर, विविध प्रकारचे कंटेनर, कंपनीचे पूर्ण पत्रा शेड व एक वाहन पूर्णपणे जळाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT