पिंपरी-चिंचवड

उन्हामुळे मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

CD

पिंपरी, ता. १३ : उन्हाचा तडाखा वाढला असल्‍याने पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक विभागाने केलेली जनजागृती, उन्‍हापासून बचाव होण्यासाठी मंडप आणि छत्रीची व्‍यवस्‍था यामुळे नागरिकांनी आपला मताचा हक्‍क बजावला. तसेच दुपारी गर्दी नसेल या विचाराने बाहेर पडलेल्‍या मतदारांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. मात्र, काही केंद्रांकडे मतदारांनी दुपारी पाठ फिरवली.
उन्‍हाचा तडाखा वाढल्याने मतदार मतदानाला बाहेर पडणार नाहीत, अशा शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र, मतदार केंद्रावर लागलेल्‍या रांगांमुळे या शक्‍यतांना पूर्णविराम मिळाला. अजमेरा हायस्कूल येथे प्रवेशद्वाराजवळील झाडांच्या आडोशाला मतदार उभे राहिले होते. तर हायस्‍कूलमध्ये प्रवेश केल्‍यानंतर मोठे पत्र्याचे शेड असल्‍यामुळे नागरिकांचा उन्‍हापासून बचाव झाला होता. पिंपळे गुरव येथील महापालिका प्राथमिक शाळेत दुपारी तीन वाजता सुमारे ३५ टक्‍के मतदान झाले. चिंचवड येथील कमलनयन बजाज हायस्कूलमध्ये मंडपाची सुविधा देण्यात आली होती. त्‍यामुळे, नागरिकांना दिलासा मिळाला होता.

पिंपरीगावात तुरळक गर्दी
पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालयात दुपारी साडेतीन वाजता उन्हामुळे मतदानासाठी रांगा कमी झाल्या. येथे दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४० टक्‍के मतदान झाले. पिंपरी गाव येथील नवमहाराष्ट्र विद्यालयात दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान उन्हामुळे मतदानासाठी तुरळक मतदार येत होते. येथे दुपारी ४ वाजेपर्यंत सरासरी ४२ टक्‍के मतदान झाले. निगडीतील पवळे हायस्‍कूल येथे दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्‍हामुळे नागरिकांनी पाठ फिरवली होती. चारनंतर पुन्‍हा गर्दी होण्यास सुरूवात झाली.

दीड तास रांगेत प्रतिक्षा
काही मतदार केंद्रांवर मतदारांची संख्या अधिक होती. त्‍यामुळे, लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या. चिंचवड येथील कमलनयन बजाज हायस्कूलमध्ये मोठी रांग लागलेली होती. त्‍यामुळे, दीड तासांनी मतदान करण्याची वेळ आल्‍याचे मतदार सांगत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT