पिंपरी-चिंचवड

मतदान केंद्रावर गेले; पण यादीतील नावे गायब

CD

पिंपरी, ता.१२ ः अनेक मतदार आणि नवमतदार बोटावर शाई लावून मतदान करण्याच्या तयारीने मतदार केंद्रावर गेले. मात्र, मतदार याद्यांतील त्रुटींमुळे अनेक प्रयत्न करुनही अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. त्याबद्दल, मतदारांनी हे अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले आहे.
चिखली, पिंपरीनगर, अजमेरा कॉलनी, वास्तु उद्योग, झेप पुनर्वसन केंद्र, थेरगाव या मतदान केंद्रांवर मतदार यादीत नाव सापडले नसल्याने अनेकांनी त्रागा व्यक्त केला. काही ठिकाणी कुटुंबातील एकेका व्‍यक्तीचे नावच गायब असल्याने संताप व्यक्त केला. तर अनेक ठिकाणी यादीत मतदारांचे चुकीचे छायाचित्र (फोटो मिस्मॅच) असल्यामुळे त्यांचा मतदानाचा हक्क हिरावला गेला.
अजमेरा कॉलनीतील रामभाऊ भिमाजी पावडे म्हणाले, ‘‘मी मतदानाला गेलो होतो. माझ्या कुटुंबियांची चार जणांची नावे सापडली. परंतु माझे यादीत न सापडल्यामुळे मला मतदान करताच आले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या ठिकाणी सातत्याने मतदान करतो. त्या मतदार यादीतच नाव नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गेले अनेक दिवस ऑनलाइन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. ’’

चिखली, शरदनगरमध्ये ‘फोटो मिस्मॅच’
खुशाल पुणेकर म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाच्या बेजबाबदारपणामुळे यादीत चुकीचे छायाचित्र (फोटो मिस्मॅच) आणि नावातील दोन अक्षरे नसल्याने मतदारांना मतदान करता आले नाही. सहा महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाचे नाव, छायाचित्र अद्ययावत करण्यासाठी पत्र आले. स्वतः कार्यालयात जाऊन छायाचित्र अद्ययावत केले तरी या मतदानापर्यंत निवडणूक अधिकाऱ्याने अद्ययावत केले नाही. त्यामुळे, भोसरी विधानसभा २०७ यादी क्रमांक १६७ चिखली, शरदनगर येथील मतदान अधिकारी सचिन गुंजाळ व झोनल अधिकारी प्रीतम बाविस्कर यांनी मतदान करण्यापासून रोखले, ही चूक कोणाची मतदाराची की निवडणूक आयोगाची आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT