पिंपरी-चिंचवड

रखरखत्या उन्हातही मतदारांच्या रांगा भोसरी विधानसभा मतदारसंघ; शाळांच्या खोल्या कमी पडल्याने उभारल्या पत्राशेड

CD

पिंपरी, ता. १३ ः शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. भर दुपारी रखरखत्या उन्हातही मतदारांच्या केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात वाढलेली बांधकामे व नव्याने राहायला आलेले नागरिक, यामुळे मतदारांची संख्या वाढली. पर्यायाने मतदार केंद्रांमध्येही वाढ केली होती. त्यासाठी वाड्यावस्त्यांवरील शाळांच्या खोल्या कमी पडल्याने पत्राशेड उभारून मतदान केंद्र केले होते.
भोसरी विधानसभा मतदारसंघात भोसरीगावासह चऱ्होली, डुडुळगाव, दिघी, मोशी, चिखली, तळवडे या गावांसह भोसरी एमआयडीसी, नेहरूनगर, शाहूनगर, मासुळकर कॉलनी, पूर्णानगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर आदी भागांचा समावेश होतो. ही गावे १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. गावठाणे सोडली तर सर्व भाग शेतीचा होता. मात्र, गेल्या दहा वर्षात शेती क्षेत्र कमी होऊन गृहनिर्माण सोसायट्या, बंगल्यांची संख्या वाढली. शहराच्या मध्यवर्ती भागात राहणारा व नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात आलेल्या नागरिकांनी या भागात सदनिका घेतल्या. साधारण दोन हजार सदनिकांपर्यंत एक-एक सोसायटी आहे. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. मतदार केंद्रांची ठिकाणे मात्र पूर्वीच्याच शाळांच्या इमारती आहेत. शिवाय, मतदारांच्या सोयीसाठी तळमजल्यावरच मतदान केंद्र असावे, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. परिणामी, त्यामुळे शाळांच्या तळमजल्यावरच मतदान केंद्र होती. मात्र, २०१९ च्या तुलनेत मतदारसंख्या वाढल्याने मतदान केंद्रही वाढली आहेत. त्यांच्यासाठी शाळांच्या आवारात व लगतच्या परिसरात पत्राशेड उभारून मतदान केंद्र साकारली होती. अशी स्थिती चऱ्होलीतील वडमुखवाडी, चोविसावाडीसह बारा वाड्या-वस्त्यांसह डुडुळगाव, मोशी, चिखलीतील वाड्या-वस्त्यांवरही बघायला मिळाली. एक-दोन ठिकाणच्या तांत्रिक अडचणी वगळता मतदान शांततेत झाले.

सोसायट्यांतील मतदार अधिक
सोसायट्यांमध्ये नव्याने राहायला आलेला मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रांवर येऊ लागले होते. त्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरातील रस्त्यांवर चारचाकी वाहनांची संख्या अधिक होती. मतदार यादीत नाव शोधण्याच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या कक्षासह राजकीय पक्षांच्या मतदार मदत कक्षातही रांगा होत्या.

वाढीव मतदान केंद्रांसाठी पत्राशेड
वाढीव मतदान केंद्रांसाठी तात्पुरते पत्राशेड उभारलेले होते. चऱ्होलीतील चोविसावाडीत दोन आणि वडमुखवाडीत दोन केंद्र पत्राशेडमध्ये होती. त्यालगतच्या व्यावसायिकांनी दिवसभर दुकाने बंद ठेवावी लागली. लगतच्या घरातील नागरिकांना घराबाहेर बसण्यास किंवा थांबण्यास मनाई होती. केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी होती.

असे झाले मतदान
भोसरी विधानसभा मतदारसंघात पाच लाख ५१ हजार ५८२ मतदार आहेत. दुपारी एकपर्यंत २५.४५ टक्के, तर सायंकाळी पाचपर्यंत ४२.२४ टक्के मतदान झाले होते. भरदुपारीही काही केंद्रांवर रांगा होत्या. सायंकाळी पाचनंतर बहुतांश मतदार केंद्रांवर गर्दी होती. सायंकाळी सहापर्यंत केंद्रावर आलेल्या सर्व मतदारांना मतदान करता आले.

आमदार लांडगे यांचे मतदान
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरीतील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदान केले. ‘‘भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महाविजय साकारणार आहोत,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फोटोः 19661

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Breaking: लागा तयारीला... BCCI ने जाहीर केली IPL 2026 च्या तारखा; फ्रँचायझींना ई-मेल अन्...

Kolhapur Young Footballers Meet Messi : वानखेडेवर ‘लय भारी’ क्षण; मेस्सीने खेळवले, टिप्स दिल्या आणि कोल्हापूरकरांचा अभिमान वाढवला

Municipal Corporation Election : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT