पिंपरी-चिंचवड

खड्डे बुजवले मात्र, खडी उचलणार तरी कोण?

CD

पिंपरी, ता. १४ ः तळवडे येथील त्रिवेणीनगर हा रस्ता नियमित वर्दळीचा परिसर आहे. त्यामुळे येथे वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अपघात, आणि वाहतूक कोंडी लोकांच्या सवयीची झाली आहे. मात्र, गेल्याकाही दिवसांपूर्वी हुमा बेकरी जवळील रस्त्यावर रस्ते खोदाईचे काम करण्यात आले होते. मात्र, काम झाल्यानंतर येथील खडी उचलण्यात आलेली नसल्याने वाहने घसरून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे असे अर्धवट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि ठेकेरांना दंड आकारण्याची मागणी रुपीनगर येथील नागरिकांनी केली आहे.


दोन महिन्यापूर्वी त्रिवेणीनगर तळवडे रस्त्यावर गाडी घसरून माझा अपघात झाला. खांद्याला हेअर लाईन फ्रॅक्चर आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने अर्धवट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.
- मनिषा जाधव, तळवडे

रस्त्यावर पसरलेल्या धोकादायक खडी संदर्भात महापालिकेच्या ‘सारथी’ कडे तक्रार केली आहे, मात्र, कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. स्पीड ब्रेकरवरील पट्टी दिसत नसल्याने अपघात होतात. म्हणून मी सारथी हेल्पलाईन नंबरवर तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रारीचे निवारण झाले नाही.
- मणेष भालेकर, तळवडे

कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता, रस्तेखोदाई सुरू आहे. महापालिका आयुक्तांनी बेकायदा रस्तेखोदाई संदर्भात धोरणनिश्चित करावे.
- विशाल कापरे, गणेश नगर

महापालिकेने रस्ते खोदले आहेत. मात्र, खडी अद्याप उचलली नाही. कधी खडी कोण उचलणार?
- राजेश जाधव, रुपीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT