पिंपरी-चिंचवड

धरणातील पाणी गरजेनुसार वापरा

CD

सोमाटणे, ता. १४ ः कासारसाई धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय न करता गरजेनुसार वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
पवनमावळ पूर्व भागातील शेतीला वरदान असलेल्या कासारसाई धरणाची पाणी पातळी वाढत्या तापमानामुळे वेगाने कमी झाली आहे. सध्या धरणात उपयुक्त पाणीसाठा ५.५७२ दशलक्ष घनमीटर असून, एकूण पाणीसाठा ६.८९१ दशलक्ष घनमीटर, ३४.६९ टक्के शिल्लक आहे. या धरणाला लाभ क्षेत्र जास्त असल्याने दिवसाला सरासरी पाऊण टक्के पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे पुढील दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय करू नये, गरजेनुसार पाण्याचा वापर करावा, असे आवाहन शाखा अभियंता अमर धायगुडे यांनी केले आहे. आढले, पुसाणे, मळवंडी धरणातील उपयुक्त पाणी पातळी शून्यापर्यंत पोचली आहे. या धरणालाही लाभ क्षेत्र असल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. पाणी समस्या टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचे मत शाखा अभियंता अमर धायगुडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT