पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : भरधाव क्रेनने दिलेल्या धडकेत अमोल राठोड (रा. मारुंजी) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडीतील विप्रो सर्कल फेज - दोन येथे घडली.
या प्रकरणी संदीप लक्षण राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, क्रेन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे चुलतभाऊ अमोल हे दुचाकीवरून जात असताना फेज-तीन कडून येणाऱ्या क्रेनने त्यांच्या दुचाकीस समोरून जोरात धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने अमोल यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर क्रेनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

दारू वाहतूक प्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : बेकायदेशीररीत्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कासारसाई ते सोमाटणे फाटा या रस्त्यावर करण्यात आली.
विकास सुरेश डोळस (वय ३३, रा. कान्हेफाटा, ता. मावळ, पुणे), विलास बबन गायकवाड (वय ४०, रा. कासारसाई, ता. मावळ , पुणे), मारुंजीतील प्रथम श्री वाईन्सचा मालक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी करीत असताना आरोपी हे दारू विक्री करण्याच्या उद्देशाने रिक्षातून दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आले. त्यांच्याकडून १७ हजार पाचशे रुपयांची दारू व एक रिक्षा असा एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रवासात पावणे तीन लाखांचे दागिने चोरीला
पिंपरी : हडपसर ते आळंदी या मार्गावर बसने प्रवास करीत असताना महिलेच्या पर्समधील पावणे तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी जयश्री शरद फलके (रा.अमुंडी, ता. आंबेगाव, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीची पर्स उघडून त्यामध्ये ठेवलेली दोन लाख ७६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवी चोरट्याने लंपास केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT