पिंपरी-चिंचवड

इंद्रायणी साहित्य सेवा पुरस्कार राजन लाखे यांना प्रदान

CD

पिंपरी,ता. १५ ः ‘कविता करणे ही कवीला लाभलेली मौलिक देणगी आहे, जिचे कवीने जतन केले पाहिजे. शेवटी कविता ही साहित्याचा आत्मा आहे,’’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य राजन लाखे यांनी केले.
देहू येथील इंद्रायणी साहित्य पीठाच्या वतीने आयोजित वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. देहू येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या या सोहळ्यात राजन लाखे यांना या वर्षीचा राज्यस्तरीय ‘इंद्रायणी साहित्यसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे, प्रा. डॉ. सुरेश वाकचौरे व साहित्यपीठाचे अध्यक्ष डॉ. अहेफाज मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
देहू येथे झालेल्या ‘इंद्रायणी आहे साक्षीला'' या उपक्रमातील राजेंद्र कांबळे, रूपाली सोनवणे, अश्विनी लिके, प्रीतम फिसरेकर, संतोष गाढवे, मीनल साकोरे, ॲड. गणेश गायकवाड पाटील, तन्वी फिसरेकर, सौरभ आहेर, कमल आठवले, अरुण कांबळे, वसंत हांडीबाग, बालकवी स्वरूप मराठे, भीमशाहीर प्रकाश गायकवाड, श्रीधर अंभुरे, डॉ. प्रशांत पाटोळे, विश्वेश्वर बोडखे, विलास अतकरी, बाबा ठाकूर, गुलाबराजा फुलमाळी, सुरेश धोत्रे, अशोक वाघमारे, दीपाली खामकर, दत्तात्रेय पोवार, कवी वसंत जावळे, भूषण भानुशाली, गजानन उफाडे, हृषिकेश कोल्हे, भाग्यलक्ष्मी क्षीरसागर, जनार्दन वारकर या कवींना गौरवण्यात आले. सूत्रसंचालन गजानन उफाडे यांनी केले. रमाकांत पडवळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT