पिंपरी-चिंचवड

अनधिकृत होर्डिंग्जवर सोमवारपासून बुलडोझर

CD

पिंपरी, ता. १६ ः शहरातील होर्डिंग्जचे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने बुधवारपासून सर्वेक्षण सुरू केले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (ता. १७) अधिकाऱ्यांसह होर्डिंग्ज मालकांची बैठक बोलावली आहे. शिवाय, नियमांनुसार नसलेल्या होर्डिंग्जवर सोमवारपासून (ता. २०) कारवाई केली जाणार आहे.
मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग्ज कोसळून १४ जणांचा बळी गेला. त्यानंतर राज्य सरकारसह जिल्हा व महापालिका प्रशासन खळबळून जागे झाले. आणि शहरातील होर्डिंग्जबाबत निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. अनधिकृत होर्डिंग कोसळून होणाऱ्या अपघाताचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली. शहरातील होर्डिंग्जबाबत सर्वंकष सर्वेक्षण बुधवारपासून (ता. १५) सुरू केले. आठ झोनमध्ये परवाना निरीक्षकांद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १७) सर्वेक्षण पूर्ण करण्याचा आदेश परवाना निरीक्षकांना दिला आहे. सर्वंकष सर्वेक्षणासाठी नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त संदीप खोत यांची नियुक्ती केली आहे. तसेच, आकाशचिन्ह व परवाना विभागाने शुक्रवारी (ता. १७) होर्डिंग्ज सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर विचार करण्यासाठी होर्डिंग मालकांची बैठक आयोजित केली आहे.

असे होईल सर्वंकष सर्वेक्षण
- सर्वेक्षणामध्ये होर्डिंग्जचे कायदेशीर स्थितीचे मूल्यांकन बघितले जाईल
- कोणत्याही प्रलंबित कायदेशीर कारवाईची छाननी होईल
- होर्डिंग्ज मालकांच्या तपशिलाची तपासणी केली जाईल
- होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल
- अनधिकृत होर्डिंग्जमुळे उद्भवणाऱ्या रहदारी अडथळ्यांचे मूल्यांकन होईल
- होर्डिंगचे ठिकाण किंवा पत्ता आणि त्याचे मंजूर व प्रत्यक्षातील आकारमान तपासले जाईल
- होर्डिंगची जमिनीपासूनची उंची, ते अधिकृत आहे की अनधिकृत हे बघितले जाईल
- होर्डिंगला पत्रा लावलाय का? वाहतुकीस अडथळा ठरणारा आहे का? अशा बाबी तपासल्या जातील
- न्यायप्रविष्ट होर्डिंग व त्याची रचना पूर्ण आहे की अपूर्ण, आदी माहिती तपासली जाईल

शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षक्ण आठ पथकांद्वारे सुरू आहे. त्याबाबत विभागाने सूचित केलेल्या बाबींची कमतरता असणाऱ्या होर्डिंगवर आम्ही सोमवारपासून (ता. २०) कारवाईची अंमलबजावणी करणार आहोत. त्यासोबतच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीची पडताळणीही केली जाणार आहे.
- चंद्रकांत इंदलकर, सहआयुक्त, महापालिका

शहरातील होर्डिंगसंबंधीचा संभाव्य धोका ओळखून त्यांच्या दुरुस्तीसाठी सर्वंकष सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी होर्डिंगची माहिती संकलनासाठी सर्वेक्षण सुरू आहे. त्यास होर्डिंग मालक व संबंधितानी सहकार्य करावे. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत होर्डिंगधारक मालकांनी दोन दिवसामध्ये आपले अनधिकृत होर्डिंग काढून अपेक्षित उपाययोजना करावे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT